Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
SARAL लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
SARAL लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणीमधील गुणांची नोंद सरल मध्ये करणेबाबत


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत राज्य स्तरावरून नियोजन करण्यात आले होते यामधील प्रथम चाचणी २८ व २९ जुलै रोजी व दुसरी चाचणी म्हणजे संकलित मूल्यमापन -१ हि चाचणी दिनांक १९ व २० ऑक्टोबर २०१६ रोजी घेतली होती.या दोन्ही ची नोंद सरल प्रणाली मध्ये करावयाची आहे.सदर गुणांची नोंद हि दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करणेची आहे. यासाठी महत्वाचे म्हणजे लोग इन होऊन excel फाईल डाऊनलोड करावी व ती फाईल भरल्यानंतर परत अपलोड करावयाची आहे.

    फाईल अपलोड करताना ती फाईल .xlx फोर्मत मध्ये आपणास भरावी लागते त्यासाठी त्या फाईल ला अपलोड करताना भरल्यानंतर .csv या फाईल format मध्ये convert करावी लागते.
येथे क्लिक करून जाणून घ्या कि अशी फाईल .csv कशी बदलावी.
ज्यावेळी आपण हि फाईल .csv format मध्ये बदलतो त्यावेळी ती न ओपन करता अपलोड करण्याचा प्रयत्न करावा.

Buy Mi Max (32GB, Gold) from Snapdeal


मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

संच मान्यतेबद्दल महत्वाची सूचना २०१६-२०१७ साठी

१. शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांच्या सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेसाठी शाळेतील दिनांक ३० सप्टेंबर, २०१६ रोजीची पटसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार दि.३०.०९.२०१६ रोजीच्या शाळेच्या पटसंख्येनुसार सर्व विद्यार्थ्यांची माहिती Student Portal मध्ये शाळा लॉगिनवर ऑनलाईन भरण्यासाठी दिनांक २४ ऑक्टोबर, २०१६ रोजी रात्री ११.५९ वा.पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. यामध्ये Student Transfer, Promotion, New Entry, Remaining Students Entry या सर्व बाबी शाळेने पूर्ण करणे आवश्यक आहे.
२. त्यानुसार Sanch Manyata या मेनुमध्ये दिलेल्या रिपोर्टप्रमाणे अंतिम होणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठीची संच मान्यता ऑनलाईन करुन दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांची माहिती विहित मुदतीत न भरल्यास त्यास सर्वस्वी संबंधित शाळा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
३. कोणत्याही परिस्थितीत,दिनांक २४.१०.२०१६ रोजीनंतर Student Portal मध्ये भरलेल्या अथवा अंतिम केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याची माहिती संच मान्यता सन २०१६-१७ साठी ग्राहय धरण्यात येणार नाही,याची सर्वांनी नोंद घ्यावी.

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

शाळा माहिती भरण्यासाठी आजपासून झाली सुरुवात , ऑफलाईन शाळा माहिती भरण्याची सुविधा आता झाली प्राप्त...



अखेर शाळा माहिती भरण्यासाठी सुरुवात झाली आहे.मागील वर्षी आपण शाळा माहिती हि संपूर्ण पणे online भरली होती पण आता सरळ प्रणाली मध्ये वापर कर्त्यांच्या मागणी नुसार हीच माहिती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरता येणार आहे.पण यासाठी आपणास काही स्टेप्स पूर्ण कराव्या लागणार आहेत.तसेच ऑफलाईन पद्धतीने माहिती भरताना काही Security सेटिंग कराव्या लागणार आहेत त्या प्रथम करून घ्याव्या लागतील.
माहिती भरताना घ्यावयाची काळजी ...

  1.  प्रथम मागील वर्षी जी माहिती भरली होती तीच जमा करा.
  2. ऑफलाईन माहिती भरणार असाल तर त्याचे softwear डाऊनलोड करून घ्यावे लागेल.खालील ठिकाणावरून  INTERNET EXPLORER डाऊनलोड करा...


  1. फाईल EXTRACT करून घ्यावी लागेल.
  2. माहिती हि INTERNET EXPLORER 9 व त्यापुढील वर्जन वरच भरावे.
  3. ब्राउजर मध्ये SECURITY SETTING करून घ्यावे लागेल.


जर सदर माहिती ऑनलाईन भरणार असाल तर खालील व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करतील.

१) पायाभूत सुविधा  Click here
२) पूर्व प्राथमिक Click here 
३) तपासणी Click here 
४) अनुदान आणि निधी Click here 
५) समिती Click here 
६) बालशिक्षण हक्क समिती Click here 
७) वेळापत्रक Click here 
८) दिनदर्शिका Click here 

येथे गेल्यानंतर आपणास यासंदर्भातील अधिक व्हिडीओ पहावयास मिळतील.

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

इयत्ता पहिली साठी विद्यार्थी माहिती झाली सुरु : तुमची Excel फाईल डाऊनलोड व अपलोड करा.


शैक्षणीक वर्ष २०१६-२०१७ या वर्षासाठी इयत्ता पहिली साठी आपण जे विद्यार्थी दाखल केले होते. त्या विद्यार्थ्यांना आपण जनरल रजिस्टर वर रजिस्टर क्रमांक दिला होता.आता सरल प्रणाली मध्ये याच्या आधरे आपणास सदर विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे त्यासाठी आपल्याला खालील स्टेप्स प्रमाणे जावे लागेल.

  • दिलेल्या ठिकाणावरून Excel फाईल डाउनलोड करणे 
  • त्या फाईल ला Macro setting मध्ये बदलून घेणे.
  • त्यामध्ये विद्यार्थ्याची माहिती भरणे 
  • दिलेली फाईल .csv मध्ये convert करुन घेणे.
  • सदर फाईल अपलोड करणे.



यामध्ये काही अडचण असल्यास खालील व्हिडिओ पहा.


एखादी फाईल excel मधून .csv format मध्ये save करायची असेल तर खलील लिंक वर भेट द्या.
  

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

Student Transfer झाले आता नेमके काय राहिले ?


Student ट्रान्स्फर ची प्रक्रिया आता चालू आहे.हि प्रक्रिया आता काही जणांची पूर्ण होत आली आहे.पण बरेच वेळा यामध्ये Student Request पाठवणे व आलेले विद्यार्थी Confirm करणे इतके काम झाले कि काम संपले असा समज होता पण अजूनही काही घटक बाकी आहेत. आलेल्या विद्यार्थ्याला रजिस्टर क्रमांक देणे व तो विद्यार्थी आपल्या शाळेत online ट्रान्स्फर झाला आहे का हे तपासणे आवश्यक आहे त्यासाठी दिलेला व्हिडीओ पहा.

रविवार, २६ जून, २०१६

Student Transfer in SARAL : सरल प्रणाली मध्ये विद्यार्थी दाखला पाठवण्याची सुविधा प्राप्त.

New[पुणे,औरंगाबाद,सोलापूर,हिंगोली,परभणी जालना,अहमदनगर,बीड,नांदेड,लातूर,उस्मानाबाद,मुंबई व सबअर्बन ,ठाणे,पालघर ] जिल्ह्यासाठी वेळ वाढविण्यात आली आहे.


 



Student Database मध्ये लवकरच Student Transfer ची सुविधा प्राप्त करून देण्यात येत आहे.पण सर्वर वरील ताण कमी करण्यासाठी काही ठराविक जिल्ह्यांनाच लॉग इन उपलब्ध करून देण्यात येत आहे.सदर जिल्ह्यांची यादी हि खालील ठिकाणी आपण पाहू शकता.आपणास दिलेल्या वेळेनुसारच आपण या विद्यार्थ्यांची नावे Transfer करावयाची आहेत.दिलेल्या वेळापत्रकानुसार आपणास आपल्या शाळेचे लॉग इन उपलब्ध होईल.



Time Table
DistrictFrom DateTo Date
पुणे03/06/201613/09/2016
अहमदनगर03/06/201613/09/2016
सोलापूर03/06/201613/09/2016
हिंगोली23/06/201613/09/2016
परभणी23/06/201613/09/2016
जालना23/06/201613/09/2016
औरंगाबाद23/06/201613/09/2016
बीड23/06/201613/09/2016
नांदेड23/06/201613/09/2016
लातूर23/06/201613/09/2016
उस्मानाबाद23/06/201613/09/2016
मुंबई (सब अर्बन)04/07/201613/09/2016
मुंबई04/07/201613/09/2016
रायगड04/07/201613/09/2016
पालघर04/07/201613/09/2016
ठाणे04/07/201613/09/2016
नंदुरबार12/07/201613/09/2016
धुळे12/07/201613/09/2016
जळगाव12/07/201613/09/2016
नाशिक12/07/201613/09/2016
वर्धा12/07/201613/09/2016
नागपूर12/07/201613/09/2016
भंडारा12/07/201613/09/2016
गोंदिया12/07/201613/09/2016
गडचिरोली12/07/201613/09/2016
चंद्रपूर12/07/201613/09/2016
सातारा12/07/201613/09/2016
रत्नागिरी12/07/201613/09/2016
सिंधुदुर्ग12/07/201613/09/2016
कोल्हापूर12/07/201613/09/2016
सांगली12/07/201613/09/2016
बुलढाणा12/07/201613/09/2016
अकोला12/07/201613/09/2016
वाशीम12/07/201613/09/2016
अमरावती12/07/201613/09/2016
यवतमाळ12/07/201613/09/2016

सरल प्रणालीमध्ये Phase I मध्ये सन २०१५-२०१६ मधील विद्यार्थ्याची माहिती यापूर्वी आपण Student Database मध्ये भरलेली आहे. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने दुस-या शाळेत त्याच इयत्तेत अथवा पुढील इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी Transfer Student सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे 

सर्व प्रथम Transfer Student ची माहिती भरून पूर्ण करावी त्यानंतर विद्यार्थी Duplication व नवीन विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी नंतर उपलब्ध करून देण्यात येईल.

Transfer Student ची सुविधा एका विभागासाठी सुरु करण्यात येऊन नंतर अन्य विभागात सुरु करण्यात येईल.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  • सरल प्रणालीमध्ये Phase-I मध्ये सन २०१५-२०१६ मधील विद्यार्थ्याची माहिती यापूर्वी आपण Student Database मध्ये भरलेली आहे. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने दुस-या शाळेत त्याच इयत्तेत अथवा पुढील इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी Transfer Student सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे .
  • New लातूर आणि औरंगाबाद Region च्या विद्यार्थ्यांसाठी खालील सूचना....
  • New सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये सरल प्रणालीमध्ये Student Portal वर विद्यार्थ्यांची माहिती भरणेत आलेली होती.
  • New यापैकी राज्य शासनाचा अभ्यासक्रम चालविणाऱ्या शाळांमधील इ.१ली ते इ.८वी इयत्तेमधील विद्यार्थी सन २०१६-१७ मध्ये वरच्या वर्गात वर्गाेन्नत झालेले आहेत.
  • New त्यानुसार याापूर्वी सरल प्रणालीमध्ये भरलेल्या इ.१ली ते इ.८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात System मध्ये पुढील वर्गात पाठविण्यात (Transfer) आलेली आहे.
  • New त्यामुळे त्याच शाळेत व वरच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Student Transfer प्रक्रियेव्दारे पाठविण्याची शाळेला कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.
  • New (उदा. एका शाळेतील इ.२ च्या विद्यार्थ्यांची माहिती सन २०१५-१६ मध्ये सरल प्रणालीत Student Portal वर शाळेने भरली होती. आता, सन २०१६-१७ साठी सदर इ.२ च्या सर्व विद्यार्थ्याची माहिती (Student Data) त्याच शाळेत इ.३ च्या वर्गासाठी System मध्ये Transfer केलेली आहे. त्यामुळे Student Portal मध्ये सदर इ.२चे विद्यार्थी इ.३ मध्ये दिसून येतील, यापध्दतीने..)

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

स्टाफ पोर्टल वरील माहिती भरण्यासाठी आवश्यक मुदत : २६ फेब्रुवारी पर्यंत.



सरल माहिती भरण्यासाठी फक्त २६ तारखे पर्यंत स्टाफ पोर्टल साठी (रायगड,लातूर,उस्मानाबाद,रत्नागिरी,पालघर,जळगाव,सांगली) याच जिल्ह्यांना लोग इन उपलब्ध आहे. पूर्वी ज्यांनी पूर्ण माहिती भरली आहे त्यांची cluster लॉगीन मधून Pay डीटेल्स रिजेक्ट केल्या आहेत. सध्या pay डीटेल्स चे व सर्विस च्या माहितीचे पेज उपलब्ध नाही. पण ज्यांनी पूर्वी माहिती भरली आहे त्यांच्या खालील माहितीचे पेज पुन्हा दुरुस्त करून भरावे.
1)Cast certification
2)Initial Appointment Details  ,
3)Udise details मधील Udise - Teaching Details.

रविवार, २७ डिसेंबर, २०१५

स्टाफ पोर्टल विषयी तारीख ३० डिसेंबर पर्यंत व माहिती भरणे आवश्यक आहे त्याविषयी......


१.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची Staff Portal वर माहिती भरण्यासाठी सोलापूर,अहमदनगर,भंडारा,औरंगाबाद, जालना, नाशिक हया जिल्हयांसाठी दिनांक 30.12.2015 पर्यंत नव्याने लॉगिन उपलब्ध केले आहेत. तसेच यापूर्वी दिलेल्या पुणे,मुंबई(उपसंचालक) जिल्ह्यांसाठी दिनांक 30.12.2015 पर्यंत login उपलब्ध राहतील. तरी सदर जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची विहित मुदतीत माहिती भरून घ्यावी. इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.
२.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरताना प्राथम्याने पुढील मेनुमधील माहिती भरावयाची आहे. Personal Details (Basic&Current Posting, Pay details), Additional Info.for Samayojan, Caste and Certificate, Initial Appointment, Qualification Details (Academic and Professional), Subject taught, Physical Handicapped Details (Applicable असेल तरच भरावे), UDISE Details.सदर मेनुमधील माहिती पूर्ण भरुन ती प्रत्येक मेनुनिहाय (Forward Menu-wise) Cluster login ला Forward करता येईल. सदरची माहिती Forward केल्यानंतर उर्वरित Other Joining Details, Training Details, Family या मेनुमधील माहिती भरावी.
३.
Server च्या तांत्रिक अडचणींमुळे Appointment Order, Individual Approval, Caste and Validity Certificate, Qualification Certificate Physically Handicapped Certificate या सर्वांसाठी Certificate Upload करण्याची Facilityतुर्त Disable करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही कागदपत्रे Upload करण्याची आवश्यकता नसून माहिती तशीच Saveकरावी.
४.
शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.
५.
दिनांक 30.09.2014 नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर नवीन कर्मचा-यासाठी तसेच एखादया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे नाव दिसत नसल्यास अशा सर्व कर्मचा-यांची माहिती भरण्यासाठी पुढील लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी. तरी शाळांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून माहिती भरावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) लॉगिन - खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मुख्याध्यापक यांचे लॉगिन - कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

सरल : विद्यार्थ्यांची पायाभूत माहिती विद्यार्थी माहिती मध्ये भरणे व Confirm करणे..


सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती भरणे व तपासणे..

सरल प्रणालीमध्ये विद्यार्थी पायाभूत गुण भरण्यासाठी खालील स्टेप्स वापराव्यात.
१) विद्यार्थी पोर्टल वर जा.
२) अपलोड Excel यावर क्लिक करा.
३) तुमची .csv फाईल तेथे अपलोड करा.
४) तुम्हाला अपलोड चा मेसेज मिळेल.

वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मुख्याच्यापाकाच्या मोबाईलवर मेसेज येईल तो मेसेज आल्यानंतर तुमचे गुण भरले गेल्याचे सिद्ध होईल.
काही प्रसंगी मेसेज आला नाही तर तुमचे मार्क्स भरले गेले कि नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स चा वापर १२ तासानंतर करावा.
१) MIS tab वर क्लिक करा.
२) तुमचा युजर व पासवर्ड टाका.
३) तुमचा pop up चालू करा.
४) क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या शाळेतील गुण भरल्याची नोंद मिळेल जर गुण दिसत नसतील तर गुण भरले गेले नाहीत असे समजावे.



अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ पहा..


शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

Student Summary मध्ये भरावयाची माहिती - School , Sanstha, Sanch Manyata and Student Summary



Student Summary साठी खालील बाबींचा समावेश केला आहे.

 पहिलीच्या वर्गात दाखल केलेली मुले -
     यामध्ये सर्व माहिती आपण शाळा माहिती मध्ये दिली आहेच.
पट नोंदणी : 
१) सामाजिक प्रवर्ग निहाय पट नोंदणी 
२) अल्पसंख्यांक पट नोंदणी.
३) वयानुरूप पट नोंदणी.

पुनर्प्रवेश : 
१) सामाजिक प्रवर्ग निहाय पुनर्प्रवेश 
२) अल्पसंख्यांक पुनर्प्रवेश.

सर्व साधारण सुविधा
प्राथमिक स्तरावर सुविधा पुरविण्यात आलेली मुले.

विशेष गरजा असणारी मुले
१) मुलांची संख्या.
२) मागील वर्षामध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलाना देण्यात आलेली सुविधा. 

निकाल
इयत्ता ४ थी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे निकाल. 

 

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

पायाभूत निकाल सरल प्रणालीमध्ये कसा भरावा..त्याच्या विषयी चित्र स्वरुपात माहिती..




2016-2017 च्या पायाभूत चाचणी व संकलित चाचणी १ ची माहिती सरल प्रणाली मध्ये कशी भरावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा खाली दिलेल्या माहितीचा आधार घ्या .




आता आपणास सरल प्रणालीमध्ये पायाभूत विद्यार्थ्याचे गुण टाकावयाचे आहेत. सदर प्रणालीमध्ये गुण टाकण्यासाठी आपणास  Excel फाईल उपलब्ध करून दिली आहे. सदरची फाईल डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. हि फाईल डाऊनलोड करताना खालील स्टेप्स वापरणे बंधनकारक आहे.अन्यथा तुमची फाईल अपलोड होणार नाही. त्यासाठी काही काळजी घेणे आवशक आहेत,
१) प्रथम student पोर्टल वर गेल्यानंतर Download Excel Sheet या tab वर क्लिक करा.
२) वर दाखविल्या प्रमाणे प्रथम शाळेचा UDISE कोड टाकावा. [
3) PASSWORD मध्ये मुख्याध्यापक पासवर्ड टाकावा. या ठिकाणी पासवर्ड अचूक असणे गरजेचे आहे कारण आपण माहिती भरल्यानंतर ज्यावेळी हि फाईल अपलोड करणार आहोत त्यावेळी चुकीच्या पासवर्ड मुळे आपणास ती फाईल ERROR दाखवणार आहे.या ठिकाणी SHOW PASSWORD SELECT केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड योग्य असल्याची खात्री करता येईल.
४)STANDARD : यामध्ये तुमची योग्य ती इयत्ता निवडा.
५) DIVISION : तुमचा तुकडी क्रमांक निवडा.
६) SORTING : येथे तुम्हाला कोणत्या स्वरुपात यादी हवी आहे ते स्वरूप निवडा. यामध्ये Alphabetical म्हणजेच वर्णा नु क्रमानुसार व Gender म्हणजेच लिंग नुसार , तुम्हाला कोणत्या स्वरुपात हवी आहे ती निवडावी.
७) सर्व माहिती भरल्यावर Download या बटनावर क्लिक करावे . तुम्हाला तुमची फाईल मिळून जाईल.

या प्रकारच्या व अधिक माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या व या खालील चर्चा या विभागामध्ये तुमच्या शंका लिहा किंवा इतरांच्या शंकाचे निरसन करा.

http://eschool4u.blogspot.in/2015/10/saral-excel-download-in-saral-education-maharashtra.html

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

Saral Education Maharashtra : TimeTable in School database

सरल या प्रणाली संदर्भात सर्व माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा..

काही ठिकाणी आपणास असे दिसते कि शाळा माहिती मध्ये " वेळापत्रक " या प्रकारामध्ये नेमेके कोणत्या व किती तासिका असाव्यात व त्यामध्ये आपल्या तासिका योग्य आहेत कि नाहीत हे आपणास समजत नाही त्यावेळेस भरलेल्या तासिका योग्य आहेत कि नाही त्या साठी येथे काही योग्य तासिका येथे दर्शविल्या आहेत. त्याचा आपण वापर करून आपल्या तासिका तपासू शकता..


इयत्ता १ ली व दुसरी 

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

शाळा ,शिक्षक व विद्यार्थी database information भरण्यासाठी आवश्यक माहिती ...



Student Transfer in SARAL : सरल प्रणाली मध्ये विद्यार्थी दाखला पाठवण्याची सुविधा प्राप्त.


  

प्रथमतः हि माहिती भरण्यासाठी तुम्ही खालील वेबसाईट वर जा.





सरल मधील दिनदर्शिका भाग वाढविलेला आहे तो कसा भरावा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.




अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी मदत मागू शकता...
E-mail:support.education@maharashtra.gov.in
Help Line support. 18002330700
Help Line support. 18002330800
Timing: 08:00 AM - 08:00 PM (Only Working Day's)

New Released Videos from E-School

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips