Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शैक्षणिक अप्लिकेशन

Eschool India
Eschool आपणा सर्वांसाठी अनेक विविध Applications आणले आहेत त्यामधील सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व applications हे google play store ला उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोर हे एक सुरक्षित प्ले स्टोर मानले जाते. आपण जेव्हा कोणतेही apps डाऊनलोड करतो त्यावेळी त्यामधील सुरक्षितता हि गुगल तपासून घेते आणि मगच ते पब्लिश करण्यासाठी परवानगी देते. Eschool चे सर्व apps हे गुगल च्या सर्व तपासण्या व चाचण्या मधून व अनेक error चे correction करून मगच उपलब्ध झाले आहे. कृपया आपण Eschool किंवा कोणतेही अप्स हे गुगल प्ले स्टोअर व्यतिरिक्त इतर मार्गाने घेऊ नये. त्यामुळे तुमच्या device ला धोका पोहोचू शकतो.
___________________________________________________
आमचे काही इतर अप्स.


Eschool4u
Eschool4u :
हे आमचे प्रथम अप्स असून यामध्ये इयत्ता ४ थी  व ७ वी च्या सर्व पाठ्यक्रमाचा अंतर्भाव केलेला आहे.यामध्ये ४ थी  व ७ वी चे भाषा , गणित व बुद्धिमत्ता चाचणी चे प्रश्न उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण खालील लिंक वर क्लिक करा.यामध्ये प्रश्न हे Random तसेच उत्तरे सुद्धा Random पद्धतीने येत असल्याने हे अप्स खूपच लोकप्रिय झाले आहे. योग्य ठिकाणी चित्राचा वापर केल्याने रंजकता वाढली आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान टिकून राहते.विद्यार्थी जर घरी स्वाध्याय करत नसेल तर आपण या अप्स चा वापर करून विद्यार्थ्यांना स्वाध्याय देवू शकतो...

https://play.google.com/store/apps/details?id=com.eschool4u111 

______________________________________________________
Eschool4all
Eschool4all
हे अप्स सर्वांसाठी असून या अप्स मध्ये सर्व ब्लॉग चा समावेश केलेला आहे. सर्व ब्लॉग वर आता जाण्याची गरज नाही त्यासाठी हे अप्स डाऊनलोड करा.तसेच शिक्षण संबधित बातम्या तसेच MDM Calculator , शासनाचे सर्व GR, Digital School साठी आवश्यक असणारे सर्व अप्स ची माहिती व इतर घटक या अप्स वर उपलब्ध आहेत. आजपर्यंतचे सर्वात लोकप्रिय अप्स म्हणून हे गणले जाते. हे अप्स डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.appmakr.eschool4


आजपर्यंत आपले कोणतेही शैक्षणिक  अप्लिकेशन हे Android Device वर उपलब्ध होते. त्यामुळे कोणीही जर नवीन मोबाईल घ्यायचा म्हटले तर शैक्षणिक कारणासाठी त्यांना Android मोबाईल किंवा tablet घ्यावे लागायचे. आता जरी तुमचे status नुसार तुम्ही Apple कंपनीचा iPhone घेतला तर तुमच्यासाठी E-School ने आता eschool4all चे iOS version आणले आहे.
         तुमचा मोबाइल iOS operating system चा असेल तर तुम्हाला फक्त Apple च्या iTune या त्यांच्या अप्लिकेशन स्टोर वर जाऊन eschool4all या नावाने search करावे लागेल. तुम्हाला त्यानंतर खाली दाखविल्याप्रमाणे लोगो दिसेल त्या वरून हे आमचे ई-स्कूल चे APP आहे हे ओळखावे. तद्नंतर हे app डाऊनलोड व install करून घ्यावे.मगच तुम्हाला या अप्लिकेशनचा लाभ मिळवता येईल.

https://itunes.apple.com/us/app/eschool4all/id1050914132?mt=8
______________________________________________________
Eschool4Word
Eschool4Word :
हे एक गेम अप्प असून यामध्ये शैक्षणिक गेम्स आहेत. सदरच्या गेम्स या इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत उपयुक्त ठरतील. या गेम्स मध्ये जे खेळाडू आहेत ते सर्व आपला स्कोर पाहू शकतात.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण होऊन ते अधिक क्षमतेने आपले अध्ययन वाढवू शकतात.आपण पालकांना इतर गेम्स देण्यापेक्षा या गेम्स दिल्या तर विद्यार्थी अध्ययन करतील तसेच ते अनावश्यक घटकाकडे वळणार नाहीत.त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढेल.अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा...

https://play.google.com/store/apps/details?id=com.weeschool4word

_____________________________________________________________________

Eschool4scratch
Eschool4scratch :
इंग्रजीसाठी एक नवीन अप्लिकेशन ज्यामध्ये विद्यार्थ्यांना नवनवीन शब्द भांडार उपलब्ध करून दिले जातील. हे अप्लिकेशन विद्यार्थ्यांना play and learn या द्वारे हे अप्लीकेशन विद्यार्थ्यांना शब्दांचे भांडार विद्यार्थ्यांना मिळेल. 
   या मध्ये विद्यार्थी दिलेले शब्द स्क्रीन वरच खोडतील ज्यामध्ये खोदताना त्यांचे गुण वापरले जातील. जितके कमी गुण खोदण्यासाठी वापरले जातील तितके गुण कामावल्यासारखे आहेत. खोडल्या नंतर त्या चित्राचे संबंधित पर्याय खाली दिले आहेत. त्यापैकी जर योग्य पर्याय निवडला तर त्या वापरकर्त्याला शिल्लक गुण मिळतील आही जर चुकीचा पर्याय निवडला तर शिल्लक गुणांमधून २० गुण वजा केले जातील. या प्रकारे हे अप्लिकेशन वापरकर्त्याची शब्दसंपत्ती खेळातून वाढण्यास फायदेशीर ठरते.

https://play.google.com/store/apps/details?id=com.wEschool4scratch
--------------------------------------------------------------------------------------------------------------

Eschool4Third
Eschool4Third :
हे अप्लिकेशन महाराष्ट्र शासनाच्या मराठी माध्यम च्या इयत्ता तिसरी साठी विकसित केले आहे.सदर अप्लिकेशन मध्ये सर्व संबोध स्पष्टीकरण सहित स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.हे अप्लिकेशन दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी उपलब्ध झाले आहे , पण त्याचे सर्व टेस्टिंग व दर्जा यासाठी नंतर ते प्ले स्टोअर वर उपलब्ध होण्यास आजचा दिनांक १२ रोजी शक्य झाले आहे.E-School चे सर्व अप्लिकेशन हे दर्जा व गुणवत्तेसाठी अपडेट केले जातात.त्यामुळे सदर अप्लिकेशन मध्ये वेळोवेळी करावयाचे बदल व त्यासंदर्भातील सूचना आम्हाला आपणाकडून अपेक्षित आहेत.सध्या इयत्ता तिसरी चे संदर्भ साहित्य उपलब्धतेनुसार आम्ही येथे प्रसारित केले आहे.
या अप्लिकेशन मध्ये आपणास काय मिळेल?
आपण जर तिसरी या इयत्ते ची PDF पुस्तके जर वापरत असाल तर त्याची साईझ सर्व मिळून ६२.८ MB पर्यंत जाते.पण हे सर्वच येथे PDF स्वरुपात न देता सर्व भाग टाईप करून येथे दिला आहे.त्यामुळे हि सर्व पुस्तके येथे 21 MB पर्यंत शक्य झाली.शिवाय फक्त पुस्तके नव्हे तर तुम्हाला पुस्तकातील चित्रा व्यतिरिक्त जी चित्रे पाठ्य पुस्तकाशी संदर्भित आहेत ती चित्रे आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ या अप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहेत.त्यामुळे तुम्ही जर एखादा संदर्भ विद्यार्थ्यांना समजावून सांगणार असाल तर त्याचे व्हिडिओ/चित्रे शोधणेची आता गरज नाही तर ते सर्व व्हिडिओ/चित्रे तुम्हाला त्या शब्दावर क्लिक केलेबरोबर मिळून जातील.
या अप्लिकेशन साठी अनेक शिक्षकांनी आपले योगदान दिले आहे.त्यांची नावे तुम्हाला अप्लिकेशन मध्ये किंवा आमच्या वेबसाईट वर पहावयास मिळतील.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.eschools

२ टिप्पण्या:

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips