Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

व्यसनमुक्ती


आज व्यसनाचे खूप दुष्परिणाम दिसून येत आहेत.समाजात अशा पदार्थाचा जास्त सेवन करताना दिसून येते.एखादा व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात असेल तर त्या मधून तो सहजासहजी बाहेर पडत नाही. अशा लोकांसाठी आज अनेक NGO उत्तम रीत्या काम करताना दिसून येतात.
    शिक्षक म्हणून समाज आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. त्यास अजून मान दिला जातो.मुलांना जर त्याच्या बालवयातच अशा व्यसन मुक्तीचे धडे दिले तर तो नक्कीच अशा व्यसनापासून लांब राहीलच पण दुसऱ्यास त्याचे सेवन हि करू देणार नाही.आपली इच्छा असते या व्यसनमुक्तीसाठी काहीतरी करण्याची पण त्यासाठी आवश्यक असणारी माहिती मात्र आपल्याकडे नसते.अशा माहितीसाठी हा सगळा खटाटोप.कारण जेव्हा आपण व्यसनमुक्ती बद्दल बोलणार असू त्यावेळी आपल्याकडे त्याची पुरेशी माहिती नसेल तर आपल्याला त्याला व्यसनमुक्ती पासून परावृत्त करू शकणार नाही.यासाठी आम्ही आधीपासून प्रयत्न करतच होतो.पण  या ठिकाणी तुमच्या जवळ असणारी माहिती जर येथे शेअर केली तर नक्कीच त्याचा सर्वांना फायदा होईल.

या ठिकाणी कोणती माहिती शेअर कराल.

  1. व्यसन मुक्तीसाठी आवश्यक असणारे विनोद.: यामध्ये सर्वच प्रकारचे विनोद जे व्यसनाचे समर्थक आहेत व नाहीत असे सर्व विनोद. ज्याचा वापर "आपण" व्यसन करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करू शकतो. ( तुम्ही तुमचे हि मत मांडू शकता )
  2. व्यसन मुक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या घोषणा : समर्थनार्थ फक्त.
  3. व्यसन मुक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या बातम्या.
  4. व्यसन मुक्ती संबंधातील NGO यांचे कार्य. 
  5. आवश्यक असणारे सार्वजनिक फोटो.(कृपया येथे गरजेचेच फोटो शेअर करावेत.)
  6. आवश्यक व्हिडिओ

(याव्यतिरिक्त काही मुद्दे असतील तर खाली comment box मध्ये लिहू शकता.)

आम्ही फार पूर्वीपासून यासंबधी फेसबुक पेज बनवले आहे त्याचाही वापर तुम्ही करू शकता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips