शिक्षक बांधवांनो ही माहिती आपल्या विद्याथ्याचे भविष्य बदलू शकते.
चला तर मग काय आहे हे पाहून घेऊ.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या
सर्वच उच्च शिक्षणासाठी दोनशेपेक्षा जास्त शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत; परंतु माहितीअभावी विद्यार्थी या सर्व योजनांपासून वंचित आहेत. ग्रामीण परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण न करता सोडून देतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती मिळाल्यास त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल.
नासा स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट योजना
सदर योजनेकरिता इयत्ता 2 री ते 5 वी, 6 वी ते 10 वी; तसेच वर्ग 11 वीत 12 वीच्या विद्यार्थ्यांकरिता नासा आणि नॅशनल स्पेस सोसायटी (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अर्ज जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात करावा.
इन्स्पायर फेलोशिप
सदर योजना विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारद्वारे देण्यात येते. डॉक्टरेट संशोधनासाठी (10 वी 60 टक्केपेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी) एक हजार विद्यार्थिनींना पाच वर्षांकरिता इन्स्पायर फेलोशिप देण्यात येते. सदर योजनेकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.
महात्मा गांधी स्कॉलरशिप
सदर योजना लंडन मेट्रोपोलिटन युनिव्हर्सिटीद्वारे देण्यात येते. 12 वीनंतर पदवी, पदव्युत्तर पदवी / सर्वांसाठी देण्यात येते. एक हजार पौंड आणि मोफत शिक्षण; तसेच शिक्षणखर्चात 50 टक्के सूट देण्यात येते. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज करावेत.