Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

संच मान्यतेबद्दल महत्वाची सूचना २०१६-२०१७ साठी

१. शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांच्या सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेसाठी शाळेतील दिनांक ३० सप्टेंबर, २०१६ रोजीची पटसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार दि.३०.०९.२०१६ रोजीच्या शाळेच्या पटसंख्येनुसार सर्व विद्यार्थ्यांची माहिती Student Portal मध्ये शाळा लॉगिनवर ऑनलाईन भरण्यासाठी दिनांक २४ ऑक्टोबर, २०१६ रोजी रात्री ११.५९ वा.पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. यामध्ये Student Transfer, Promotion, New Entry, Remaining Students Entry या सर्व बाबी शाळेने पूर्ण करणे आवश्यक आहे.
२. त्यानुसार Sanch Manyata या मेनुमध्ये दिलेल्या रिपोर्टप्रमाणे अंतिम होणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठीची संच मान्यता ऑनलाईन करुन दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांची माहिती विहित मुदतीत न भरल्यास त्यास सर्वस्वी संबंधित शाळा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
३. कोणत्याही परिस्थितीत,दिनांक २४.१०.२०१६ रोजीनंतर Student Portal मध्ये भरलेल्या अथवा अंतिम केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याची माहिती संच मान्यता सन २०१६-१७ साठी ग्राहय धरण्यात येणार नाही,याची सर्वांनी नोंद घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips