Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
Question Papers लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Question Papers लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ जुलै, २०२१

सेतू प्रश्न पत्रिका आपल्या शाळेच्या आणि विद्यार्थ्याच्या नावासहित मिळवा एका सेकंदात

 या प्रश्न पत्रिका आपणास हि माहिती भरल्यानंतर आपल्या शाळेच्या व विद्यार्थ्याच्या नावासहित pdf स्वरूपात फक्त १ मिनिटाच्या आत  उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासाठी आपणाकडून कोणतीही फी घेतली जात नाही. फक्त Google इ-मेल असणाऱ्यांना व त्याद्वारे login करणाऱ्यांनाच तांत्रिकदृष्ट्या आम्ही सहकार्य करू शकतो.

माहिती भरताना पाळायच्या सुचना.

१) माहिती मध्ये आपला ई-मेल हा चालू असणारा द्यावा कारण सदर pdf हि आपल्या ई-मेल वर पाठविली जाईल.

२) जी माहिती मराठी मध्ये विचारली जाईल ती मराठी व इंग्रजी मध्ये विचारलेली माहिती इंग्रजी मध्ये भरावी.

३) फक्त शाळेसाठी एकच pdf हवी असेल तर विद्यार्थ्याचे नाव व हजेरी क्रमांकाचा रकाना मोकळा सोडावा.

४) सदर माहिती भरण्याचा अधिकार शाळा , संस्था, वर्गशिक्षक , पालक, विद्यार्थी व नागरिक यांना आहे.

५) भविष्यात अशी माहिती आम्ही मोबाईल द्वारा हि देण्याचा मानस आहे.

६) तुम्हाला शाळेसाठी फक्त एकच pdf हवी असेल तर विद्यार्थ्याचा क्रमांक व नाव टाकू नका 


सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

मराठी माध्यम प्रश्न पत्रिका आकारिक चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी १ ते सत्र २ पर्यंत.


शिक्षकांना आजकाल आकारिक व संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका स्वतः काढाव्या लागत आहेत, सर्वांना अशा प्रश्न पत्रिका स्वतः काढणे आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षक स्वतः प्रश्न पत्रिका काढू शकतो. पण अशा प्रकारच्या प्रश्न पत्रिका काढणे व त्या सेट अप करणे वेळखाऊ आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्न पत्रिकांचे Templets आम्ही या वेबसाईट वर देत आहोत तुम्ही या Excel फाईल चे हे टेम्प्लेट तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि त्यातील प्रश्न तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या काठीण्य पातळीनुसार बदला. आता काही प्रश्न पत्रिका विविध वेबसाईट वर व ब्लॉगवर उपलब्ध आहेत त्याचाही तुम्ही वापर करू शकता.
  • आमच्या या वेबसाईट वर तुम्हीही तुमच्या प्रश्न पत्रिका देऊ शकता 
  • त्याचा नमुना खाली दिलेल्या फाईल प्रमाणे असेल. 
  • अशा प्रश्नपत्रिका आमच्या वेबसाईट वर दिल्या जातील.
  • त्या साठी गूगल font चा वापर करावा.
  • प्रश्न पत्रिका तुमच्या Dropbox किंवा Google Drive वर लिंक करून त्याची लिंक द्यावी.
  • तुम्हाला जर अशी लिंक करता येत नसेल तर सदर फाईल E-mail ने पाठवावी.
  • फाईल lock नसावी. तुमच्या फाईल मध्ये तुमची वेबसाईट किंवा तुमची दुसरी कोणतीही जाहिरात असली तरी चालेल पण ती जाहिरात मुख्य पानावर असावी ती प्रश्न पत्रिकेवर प्रिंट होऊ नये याची काळजी घ्यावी.
  • प्रश्नपत्रिका फाईल इयत्ता , विषय या नावाने save करावी.
  • तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली Comment बॉक्स मध्ये लिहावे.

या प्रश्न पत्रिका बद्दल थोडेसे महत्वाचे.
या प्रश्नपत्रिका इतर शिक्षकांनीच बनवलेल्या आहेत.
या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न तुम्ही तुमच्या वर्गाच्या काठीण्य पातळीनुसार बदलू शकता.
मुख्य पानावरील दिलेल्या ठिकाणावरून ज्या त्या विषयावर जावे.
सदर फाईल A4 पेपरवर प्रिंट होईल अशी सेट केली आहे.

इयत्ता  परीक्षा मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास १ परिसर अभ्यास २
1 ली चाचणी क्र.१ n n n NA NA
सत्र क्रमांक १ MCGM MCGM MCGM NA NA
चाचणी क्र.२ n n n NA NA
सत्र क्रमांक २ n n n NA NA

शनिवार, १९ मार्च, २०१६

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र : द्वितीय सत्र परीक्षा सराव प्रश्नसंच

आता सत्र क्रमांक २ जवळ आली असल्याने प्रश्नपत्रिका साठी आपली धावपळ चालली आहे. पण इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या भाषा व गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका MSCERT कडून मिळणार असल्याने त्याच्या सराव प्रश्नपत्रिका त्यांच्या वेबसाईट वर देण्यात आल्या होत्या पण सध्या काही कारणास्तव त्याची लिंक खुली होत नाही. आपल्या काही बांधवांनी या प्रश्नपत्रिका या save करून त्यांच्या ब्लॉग व वेबसाईट वर Sorting करून ठेवल्या आहेत. आपण त्या ठिकाणावरून या सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घ्याव्यात.
    सदर परीक्षा या भाषा व गणित संबधित आहेत त्यामुळे इतर प्रश्नपत्रिका या आपापल्या स्तरावर तयार कराव्यात. ज्या शक्य आहेत त्या येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. MSCERT स्तरावरून हि परीक्षा ४ व ५ एप्रिल २०१६ रोजी घेनेत याव्यात असे सूचित करण्यात आले आहे. तरी त्याबाबत आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अधिक चर्चा करूनच माहिती घ्यावी व कार्यवाही करावी.

आपण सराव प्रश्नपत्रिका खालील संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता.

http://mahazpschoollive.blogspot.in/2016/03/pragat-shai...

http://zppsjamadadewasti.blogspot.in/2016/03/blo....


Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips