Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

मार्क झुकेरबर्ग : फक्त $1 पगार घेणारा अब्जाधीश, फेसबुकचा संस्थापक.

Mark Zukerbarg
नाव : मार्क झुकेर बर्ग
जन्म : १४ मे १९८४ (वय ३२ )
जन्म ठिकाण : White Plains , न्यू योर्क. अमेरिका.
व्यवसाय : Computer programmer, internet entrepreneur
ओळख : फेसबुक चा संस्थापक.
पद : CEO ऑफ फेसबुक
वेबसाईट : http://www.facebook.com
पगार : फक्त $1

मार्क झुकेर बर्ग एक अत्यंत साधे व्यक्तिमत्व. पण अमेरिकेतील आजचा सर्वात लहान वयाचा अब्जाधीश आहे. मार्क ने आपले शिक्षण हॉवर्ड विद्यापीठात पूर्ण केले.आणि या कालावधीतच या व्यक्तीला आपल्या या फेसबुकची संकल्पना सुचली.हे फेसबुक बनविण्यासाठी त्याला त्याच्या
वर्गमित्राची मदत झाली. फेस्बुक्चे पहिले ऑफिस हॉवर्ड विद्यापीठाच्या होस्टेलच्या एका खोलीतच सुरु झाले. या संकल्पनेचा मुख्य उद्देश होता मित्रांची भेट घालून देणे आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांशी आपल्या भावना शेअर करणे.मग यामध्ये त्यांनी आपले फोटो आपली रिलेशनशिप यासारख्या बाबींचा समावेश सुद्धा करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले.सुरुवातीला फेसबुक बनविल्यानंतर याला फक्त त्याच्या कॉलेज मधीलच युजर्स मिळाले.पण युजर्स जर वाढवायचे असतील तर याचे मार्केटिंग करणे व याचा वापर कसा करावा हे वापरकर्त्यांना माहित असणे आवश्यक होते. कारण जरी फेसबुक हे
माहिती झाले तरी त्याचे वापर नेमके कसे करावे किंवा ते न उघड्ल्याने युजर्स येत नव्हते. यासाठी मार्कने स्वतः याचे मार्केटिंग करावयाचे ठरवले. नंतरच्या कालावधीत त्याने प्रत्येक कॉलेज मध्ये जाऊन याचा वापर कसा करावा आणि कसे वापरावे व का वापरावे याची मार्केटिंग केली. त्यानंतर कॉलेज युवक व युवतींना या फेसबुकने जी भुरळ घातली ती आजपर्यंत टिकून आहे.या मार्केटिंग साठी त्याला त्याचा मित्र  डस्टिन मोस्कोवित्ज़ याची खूप मदत झाली.

Peter Thiel
नंतर २००४ साली मार्क पालो आल्टो , कॅलिफोर्निया येथे गेला आणि तेथेच त्याने आपले भाडे कराराने घेतलेल्या एका घरामध्ये आपले फेस्बुक्चे ऑफिस सुरु केले.यासाठी पीटर थिअल याने आपली गुंतवणूक केली.तेव्हा पासून या फेसबुक चे युजर्स वाढत होते आणि या कामात तो इतका व्यस्त झाला कि त्याने आपले हॉवर्ड विद्यापीठातील शिक्षणाकडे लक्षच दिले नाही व तो तिकडे परत गेला हि नाही.नंतर त्याच्या फेसबुक ने मागे वळून पहिले नाही.
  या दरम्यान त्याला काही समस्यांचा सामनाही करावा लागला. जसे पालेस्तैन आतंकवादी हल्ला, ConnectU चे न्यायालयीन दावे, Saverin Lawsuit चा दावा, पाकिस्तान मधील फेसबुक बंदी या व इतर प्रकारच्या संकटांचा त्याला सामना करावा लागला.
With daugther :Chen Mingyu 
मार्कचे वैवाहिक जीवन :
मार्क व त्याची प्रेमिका Chan यांचे 2003 सालापासून डेटिंग सुरु होते.नंतर त्याचे वैवाहिकजीवन २०१२ साली सुरु झाले.Chan हि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे. लग्नानंतर Chan चे तीनवेळा गर्भ पात झाले. मार्कला मुलगी हवी होती. आणि १ डिसेंबर रोजी मार्क ने आपल्या पहिल्या मुलीची घोषणा आपल्या फेसबुक पेजवर दिली.त्यानिमित्ताने त्याने आपले ९९% शेअर्स वाटले. आजही मार्क झुकेरबर्ग फक्त $1 इतकाच फायदा घेतो.
.
मार्कचे फेसबुक मध्ये कसा असतो? 
आजही सर्व इन्टरनेट जगतामध्ये सत्ता काबीज केलेला हा सम्राट अजूनही जमिनीवर बसून बर्गर आणि पिझ्झा खातो, सर्व सामान्य माणसाप्रमाणे बाजारात फेरफटका करतो, अजूनही त्याचे काही ऑफिस हे एखाद्या गरेज प्रमाणे आहेत.जसे युजर्स फेसबुक वर विना ताण तणावाशिवाय फेरफटका मारतो अगदी तसच फेसबुक मधील कर्मचारी तणाव मुक्त असतात. आजही मार्क या फेसबुक मधील ऑफिस मध्ये एक CEO म्हणून नव्हे तर एक कर्मचारी म्हणून वावरतो.



द सोशल नेटवर्क : 
 या मार्क झुकेरबर्ग च्या या फेसबुक च्या प्रवासाचा नुकताच २०१० मध्ये एक चित्रपट आला होता.ज्याने तीन ऑस्कर पुरस्कार देखील मिळवले.या चित्रपटाचे नाव होते “The Social Network” ज्या मध्ये मार्क झुकेर बर्ग च्या प्रतिमेला धक्का देणारे सुद्धा प्रसंग आहेत पण त्याने या संदर्भात फक्त इतकेच म्हटले आहे कि “ "I just wished that nobody made a movie of me while I was still alive.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips