आपल्याला महावितरण कंपनीकडून वीजबिल मिळत असते व वीजबिल भरण्यासाठी आपणास वीजबिल भरणा केंद्रावर जावे लागते. रांगेत उभे राहून आपल्याला हे बिल भरावे लागते पण online सुद्धा हे वीजबिल आपण महावितरण कंपनीच्या वेबसाईट वर भरू शकतो. त्यासाठी आपणाजवळ इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट/क्रेडीट कार्ड असणे आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या आपले वीजबिल केंव्हाही व कोठेही भरू शकता फक्त त्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स चा अवलंब करा.
प्रथम खालील वेबसाईट वर जा. तुम्हाला वीजबिल चे पेज दिसेल.
http://wss.mahadiscom.in/wss/wss
?uiActionName=getViewPayBill
यामध्ये तुमच्याजवळ जर तुमचे कोणतेही वीजबिल उपलब्ध असेल तर ते इतर तपशीलासाठी जवळ असावे कारण त्यामधील काही बाबी तुम्हाला तुमच्या बिलासाठी आवश्यक आहेत.
आपली माहिती भरा व Submit वर क्लिक करा.
तुम्हाला तुमची आताची भरावयाची रक्कम दिसेल. त्या ठिकाणी Make Payment वर क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या बिलाची सर्व माहिती मिळेल व त्यासोबत तुमचे आताचे बिल योग्य असल्याची खात्री करा.
सर्व अटी व नियम वाचा व मान्य असल्याची निवड करा.
खालील रिकाम्या जागेत तुमचा संपर्क क्रमांक टाका.
तुमची बिलाची रक्कम तपासा व Pay Now वर क्लिक करा.
सर्वात शेवटी तुम्हाला तुमच्या कोणत्या पर्यायाद्वारे पेमेंट करावयाचे आहे तो पर्याय निवडा.
तुमची पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण करा,
तुम्हाला सर्वात शेवटी तुमच्या Transaction ID सह तुमच्या पेमेंट चे confirmation
मिळेल.दिलेल्या प्रिंट च्या पर्याय मधून तुम्ही तुमची प्रिंट काढू शकता किंवा त्याची PDF बनवू शकता.
Freecharge वरून आपले वीजबिल कसे भरावे.
Freecharge.in या वेबसाईट ला लॉगीन करा.
Bill Payment वर क्लिक करा.
१) Electricity चा योग्य पर्याय निवडा.
२) Consumer नंबर टाका जो आपल्या बिलावर असतो.
३) Billing unit नंबर टाका , हा क्रमांक आपल्या वीज बिलावर मिळेल.
४) Processing Cycle क्रमांक टाका. जो आपल्या बिलावर PC या क्रमांकाखाली दिलेला असतो..
५) तद्नंतर तुम्हाला तुमचे आताचे बिल किती आहे ते दाखवले जाईल.
६) त्यानंतर Proceed To Pay या वर क्लिक केल्यानंतर तुमची पेमेंट पेज दिसेल.
७) पेमेंट पेज वर तुम्हाला दिलेला असेल तर Coupon Code टाका.
८) जर Congratulation चा मेसेज मिळाला तर तुम्हास त्याचा Cash back मिळेल.
९) तुमचा wallet balance न वापरता तुमचे पेमेंट डेबिट/क्रेडीट कार्ड द्वारे पूर्ण करा.
१०) तुम्हाला तुमचा balance परत मिळेल.
खालील कोड आपल्या मोबाईलवर स्कॅन करा व हि माहिती व याच्या संबधित लिंक आपल्या मोबाईलवर उघडा...
विज बील युनीट प्रमाने येत का नाही....?
उत्तर द्याहटवा