आपण YouTube साठी व्हिडिओ बनवताना आपणास चित्रे
आवश्यक असतात पण आपल्याला हि चित्रे मुक्त वापरासंबंधीच घ्यावी लागतात.काही वेळा
आपण जी चित्रे डाऊनलोड करून व्हिडिओ मध्ये वापरतो त्यावर त्या वेबसाईट चे किंवा
कंपनीचे नाव असते.(उदा. Shutterstock,BrainyQuote.com ) अशी चित्रे आपणास इंटरनेट वर उपलब्ध असतात जी
आपल्याला वापरता येत नाहीत किंवा आपणास वापरण्यास परवानगी नाही. जरी अशी चित्रे तुम्ही
वापरली तरी सुरुवातीला तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही पण ज्यावेळी तुम्ही
उच्च स्थानावर पोहोचता किंवा तुमच्या channel ची Popularity वाढते त्यावेळी
तुम्हाला या वापराचा त्रास होण्याची शक्यता असते. आता मुक्त चित्रे शोधावी कशी ती
या मालिकेत पाहणार आहोत.
गूगल वर आपण ज्या वेळी सर्च करतो त्यावेळी
आपल्याला सर्च चा निकाल पहावयास
मिळतो . प्रथम आपणास जो निकाल मिळतो तो सर्व
समावेशक असतो. म्हणजे ज्या Keyword ने आपण सर्च केले त्या संबंधी सर्व दुवे आपणास प्रथम
पानावर उपलब्ध होतात. पण आपणास जर त्या संबंधी चित्रे हवी असतील तर Images वर
क्लिक केल्यानंतर फक्त चित्रे आपणास मिळतील.या सर्व चित्रामधील मुक्त वापराची
चित्रे खालील प्रमाणे कृती करून मिळवावी. आपण उदाहरण म्हणून “पाऊस” संबंधित मुक्त
चित्रे वापरणार आहोत- प्रथम Google.co.in हि वेबसाईट उघडा.
- Search box मध्ये Rain हा शब्द टाका.
- तुम्हाला सर्व दुवे मिळतील.
- वरील बाजूस All, Images, Maps, Videos अशा प्रकारची ओळ दिसेल त्यातील Images वर क्लिक केल्यावर सर्व प्रकारच्या Images दिसतील.
- तेथून पुढे setting व tools चा पर्याय दिसेल.
- Tools पर्याय निवडा.तुम्हाला Size, Color,Type,Time, Usage right, More Tools असे पर्याय दिसतील.
- यातील Usage Right वर क्लिक करा.
- येथे तुम्हाला जी यादी मिळेल त्यातील Labeled for reuse with modification या पर्याय ला निवडा.
- आता तुम्हाला जी चित्रे मुक्त वापरासाठी उपयुक्त आहेत तीच दिसतील, तुम्ही तुमची चित्रे निवडा व डाऊनलोड करा.
- आता या चित्रांचा वापर तुम्ही तुमच्या व्हिडिओ निर्मिती साठी करू शकता.
- आता हि चित्रे तुमच्या YouTube वर व्हिडीओ अपलोड करणेसाठी अडथळा असणार नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा