Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शुक्रवार, ३० जून, २०१७

YouTube वापरताय? तर हे तुम्ही वाचलेच पाहिजे

आमचे व्हिडिओ पहा.
जर आपण youtube चे वापरकर्ते असाल तर आपणास खूप चांगली संधी YouTube ने दिली आहे. आजकाल इंटरनेट च्या कमी दरातील व स्वस्त प्लान मुळे YouTube चा वापर करणारे जास्त वापरकर्ते संख्या वाढली आहे. गुगल सर्च पेक्षा आजकाल आपल्या प्रश्नांची उत्तरे youtube वर सुटसुटीत पणे सापडतात. तुम्हीही स्वतःचे youtube channel सुरु करू शकता.पण जर तुम्ही स्वतःचे youtube channel सुरु करणार असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या त्यांच्या काही पोलिसी पाळल्या पाहिजेत.
Channel सुरु करताना या बाबी लक्षात घ्या.
 • YouTube वर तुम्ही स्वतःचा व्हिडीओ अपलोड करू शकता.
 • अपलोड करणाऱ्या व्हिडीओ चे चित्रीकरण तुम्ही स्वतः केले पाहिजे.
 • तुम्ही दुसऱ्या channel किंवा व्यक्तीचे व्हिडीओ त्याच्या परवानगीने तुमच्या channel वर वापरू शकता.
 • तुम्ही जर इंटरनेट वरील चित्रे आपल्या व्हिडीओ वर वापरत असाल तर ती चित्रे त्या मालकाच्या परवानगीने किंवा मुक्त वापराच्या वर्गीकरणातील असावीत.(येथे क्लिक करून तुम्ही चित्रे मुक्त वापर कशी करू शकता हे शिका)
 • संगीत वापरत असताना सर्व संगीत तुम्ही स्वयं निर्मित किंवा Royalty फ्रि असावे.असेच संगीत तुम्ही तुमच्या व्हिडीओ ला देऊ शकता.
 • व्हिडीओ टाकत असताना कोणाच्याही भावना दुखावणारे, अश्लील प्रदर्शन, दुसर्याचे नक्कल केलेले, परवानगी नसलेले, समाजमान्य नसणारे किंवा किळसवाणे अशा प्रकारचे नसावेत.
 • वरील पैकी नियम पाळले नाहीत तर.
 • वरील नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर YouTube ची टीम तुमचे व्हिडीओ channel Delete करू शकते.(तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता.)
 • अशा प्रसंगी तुम्ही कितीही Subscribers मिळवलेले असतील तर तुम्हाला त्याबद्दल कोणताही access मिळत नाही.
 • तुम्ही जर योग्य असाल ,आणि जर तुमचे channel delete केलेले असेल तर तुम्हाला Recovery मागण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
 • पण सर्वस्वी अधिकार YouTube कडे असतात त्यामुळेrecovery मिळण्याचे chances कमी असतात.


तुम्ही जर YouTube च्या अटी व नियमाचे पालन केले तर ....


 • YouTube तुम्हाला त्यांच्या समुहा मध्ये सामील करून घेते.
 • तुमची व्हिडिओ Creativity अधिक सक्षम करणेसाठी तुम्हाला प्रशिक्षण देते.
 • YouTube च्या सर्व पात्र ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळतो.
 • YouTube च्या पार्टनरशिप प्रोग्राम द्वारे तुम्ही तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून उत्पन्न मिळवू शकता.

तुम्ही जर नवीन creator असाल तर खालील बाबी पाळा.


 • YouTube च्या सर्व नियमांचे पालन करा.
 • सुरुवातीचे कमीत कमी १० व्हिडीओ अतिउत्कृष्ट दर्जाचे अपलोड करा.
 • महिन्यातून एक व्हिडीओ अपलोड झाला तरी चालेल पण दर्जा टिकवा.
 • तुमच्या channel ची निवड तुम्ही ज्या वर्गीकरणानुसार केली त्या संबधित व्हिडिओ टाका.त्याव्यतिरिक्त इतर व्हिडीओ टाकू नका.
 • व्हिडीओ चे टायटल पूर्णपणे व त्या व्हिडिओ ची माहिती देणारे टाका.
 • व्हिडिओ ला Thumbnail आकर्षक असे द्या.
 • व्हिडिओ ला लाईक व Subscribe वाढतील असा दर्जा ठेवा.
 • व्हिडिओ मधील Effect चांगले असावेत ज्याद्वारे पाहणाऱ्याचे अवधान टिकले पाहिजे.


वरील बाबी लक्षात घेतल्यास तुम्ही तुमचे channel उत्कृष्ट पाने चालवू शकता.तुमचे channel कायमचे टिकून राहतील शिवाय YouTube बरोबरचे तुमचे संबंध अधिकाधिक दृढ होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips