स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६ साठी दिनांक १२ ऑगस्ट २०१६ पर्यंत आवेदन मागविण्यात येत आहेत.सर्व शाळांनी सदरचे आवेदन पत्र भरावे यासाठी आवाहन केले आहे, सदरचे आवेदन खालील लिंक वर सुद्धा आपन भरू शकता.
सदर माहिती आपण वेबसाईट वर जाऊन देखील भरू शकतो. त्यासाठी आपण Swachh Vidyalaya या ठिकाणी क्लिक करावे.
नवीन ठिकाणी स्वच्छ विद्यालय पुरस्कार या ठिकाणी क्लिक केल्यानंतर दुसरी वेबसाईट उघडलेली दिसून येईल , तेथून आपण खालील मार्गाने आपला फॉर्म भरू शकता.
१) मोबाईल अप्लिकेशन : आपण 07097298400 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन अप्लिकेशन ची लिंक मिळवू शकता.किंवा येथे क्लिक करून अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.
२) वेब पोर्टल वरून : आपन या वेब साईट च्या वेब पोर्टल वरून सुद्धा हा फॉर्म भरू शकतो.त्यासाठी आपण खालील वेबसाईट वर जाणे आवश्यक आहे.
सदर वेब पोर्टल वर माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या ठिकाणी आपण आपला आलेला OTP व udise क्रमांक टाकल्यास आपल्याला आपली माहिती लॉग इन करून भरता येईल.
या संदर्भात माहिती कशी भरावी हे सांगणारी PDF फाईल डाऊनलोड करा. व त्याप्रमाणे आपली माहिती तयार करून आपण या वेब पोर्टल वर भरू शकता.
काही कारणामुळे काही जणांना सदरचा पर्याय कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे याच्या माहिती साठी व हा फॉर्म online कसा भरावा याची माहिती सांगणारा व्हिडीओ खाली देत आहे , सदरचा व्हिडिओ youtube वर असलेने share करून त्याचा फायदा इतरांना हि करून द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा