Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
marathi answers लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathi answers लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ मे, २०१५

Palindrome ( विलोमपदे)

लहानपणी Palindrome हा प्रकार आवडायचा.
Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.
इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.  लहानपणी तर दोन तीनच माहित होते.
१)  चिमा काय कामाची
२) ती होडी जाडी होती.
३) रामाला भाला मारा.
पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला 'विलोमपद' असा शब्द आहे, आणि मराठीतली विलोमपदे देणारं चक्कं एक Android app (Marathi Palindromes नावाचं) सुद्धा आहे.
ही म्हणजे हाईट झाली, मराठीची इंग्रजीशी लय भारी फाईट झाली.
मराठी धावत नसली तरी एक एक 'पाऊल पडते पुढे' हे, तुम्ही काही म्हणा, पण अगदी Like करण्यासारखं आहेच.
आता ही मराठी विलोमपदे बघा (नया है यह हं !)
१) टेप आणा आपटे.
२) तो कवी ईशाला शाई विकतो.
३) भाऊ तळ्यात ऊभा.
४) शिवाजी लढेल जीवाशी.
५) सर जाताना प्या ना ताजा रस.
६) हाच तो चहा
वा वा, हे ताजे मराठी पॅलिनड्रोम्स, आय मीन, विलोमपदे वाचून मझा आला. आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॅलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?
(मूळ फेसबुक पोस्ट सौजन्यः माधव शिरवळकर)
[5/9, 8:12 PM] ‪+91 92702 14277‬: उलट-सुलट दोन्ही कडून वाचा
१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो

शनिवार, १४ मार्च, २०१५

दैनंदिन नोंदी विषयीचे मुद्दे

नोंदी कशा कराव्यात
मराठी
1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो

रविवार, २५ जानेवारी, २०१५

आपल्या संगणकावर मराठी मध्ये टाईप करा.


आपल्या घरी व शाळेत आपण संगणकावर काम करतो पण काही वेळा सोप्या गोष्टी सुद्धा माहिती नसल्याने अवघड होत जातात. येथे मराठी किंवा तत्सम भाषांमध्ये कसे लिहावे व त्यासाठी काय आवश्यक आहे त्याची माहिती दिली आहे.
आवश्यक घटक. : इंटरनेट , windows OS, 
 १. प्रथम google.co.in उघडा.
२. त्यामध्ये google input tool टाईप करा.
३. तुम्हास त्यासंधर्भातील काही links दिसतील.
४. google ची इनपुट टूल असणारी लिंक उघडा.
५.तुम्हास खाली दिसणारी लिंक उघडावयाची असेल.
     http://www.google.com/inputtools/windows/
६.दिसणाऱ्या यादीतील तुमची भाषा निवडा. [ marathi / hindi / etc ]
७. terms & conditions accept करा.
८.  Download वर Click  करा.
9. तुमच्या संगणकावर setup file दिसेल. ती run बटन दाबून उघडा.
१०.तुमच्या संगणकावर setup सुरु होईल.
११. setup संपल्यानंतर तुमच्या संगणकाच्या खालील पट्टीवर तुम्हास EN असा लोगो दिसेल त्यावर click करा.
१२. तुमची आवडती भाषा निवडा. व संगणकावर जर Shivaji टाईप केले तर तुम्हास "शिवाजी" हा शब्द उमटलेला दिसेल.
१३.तरीसुद्धा यासंदर्भातील setup करण्यासाठीचा video पाहायचा असेल तर आमच्या Facebook page ला येथे click करून Like करा.

14, टीप : एकदा install केल्यानंतर नंतर इंटरनेट ची गरज नाही.

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips