Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शनिवार, ९ मे, २०१५

Palindrome ( विलोमपदे)

लहानपणी Palindrome हा प्रकार आवडायचा.
Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.
इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.  लहानपणी तर दोन तीनच माहित होते.
१)  चिमा काय कामाची
२) ती होडी जाडी होती.
३) रामाला भाला मारा.
पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला 'विलोमपद' असा शब्द आहे, आणि मराठीतली विलोमपदे देणारं चक्कं एक Android app (Marathi Palindromes नावाचं) सुद्धा आहे.
ही म्हणजे हाईट झाली, मराठीची इंग्रजीशी लय भारी फाईट झाली.
मराठी धावत नसली तरी एक एक 'पाऊल पडते पुढे' हे, तुम्ही काही म्हणा, पण अगदी Like करण्यासारखं आहेच.
आता ही मराठी विलोमपदे बघा (नया है यह हं !)
१) टेप आणा आपटे.
२) तो कवी ईशाला शाई विकतो.
३) भाऊ तळ्यात ऊभा.
४) शिवाजी लढेल जीवाशी.
५) सर जाताना प्या ना ताजा रस.
६) हाच तो चहा
वा वा, हे ताजे मराठी पॅलिनड्रोम्स, आय मीन, विलोमपदे वाचून मझा आला. आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॅलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?
(मूळ फेसबुक पोस्ट सौजन्यः माधव शिरवळकर)
[5/9, 8:12 PM] ‪+91 92702 14277‬: उलट-सुलट दोन्ही कडून वाचा
१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips