Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

रविवार, १३ मार्च, २०१६

आपल्या स्मार्ट कामकाजासाठी QR -Code कसा बनवावा ?

आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही घटक वारंवार वापरतो , या घटकांची पुनरावृत्ती होत असते. यासाठी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण whatsapp वर लांबलचक Text लिहून ठेवलेली असते ती आपल्याला कमीत कमी जागेत बसवणे आवश्यक आहे. त्यासाठी ब्लॉग्स व वेबसाईट यांचा प्रामुख्याने वापर केला जातो , पण त्याची लिंक share करणे व ती जतन करणे मुश्कील काम आहे. आपल्याला आपल्या शाळेचा अहवाल अधिकाऱ्यांना पाठवायचा असतो तो अहवाल कागदावर पाठवून तो गहाळ होणे असे प्रकार होतात.
    पण आता कमीत कमी जागेत बसणारा व जास्तीत जास्त घटक सामावून घेणारा QR कोड आपल्यासाठी वरदान आहे. याच QR कोड चा वापर करून सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले यांनी पूर्ण पुस्तक QR कोड वर बसवले व शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली.

 QR कोड म्हणजे नेमके काय?
QR कोड हा एक चौकोनी आकाराचे design असलेला एक गुंतागुंतीचा दिसणारा कोड असतो. तो खाली दाखविला आहे.

QR कोड चा नेमका वापर काय?
एखाद्या शब्दाला आपण कोड देवून , लिंक ला कोड देवून त्याचे स्कॅन केल्यानंतर वापरकर्त्याला त्या कोडमधील घटक पटकन त्याच्या मोबाईलवर दिसू लागतात.

यासाठी नेमक्या कोणत्या साधनाची आवश्यकता आहे?
QR कोड Read करण्यासाठी QR कोड रीडर अप्लिकेशन ची आवश्यकता असते. हे अप्लिकेशन तुम्ही गुगल च्या प्ले स्टोर मधून सुद्धा घेवू शकता.
किंवा खालील लिंकवर जाऊन डाऊनलोड करू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=de.gavitec.android

QR कोड कसा बनवावा?
QR कोड बनवण्यासाठी खाली एक व्हिडिओ दिला आहे तो पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा QR कोड बनवू शकता.


1 टिप्पणी:

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips