Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

रविवार, १३ मार्च, २०१६

Excel Formula : SUM ,Substract , Multiplication , Division

Microsoft Excel हे एक असे softwear आहे ज्याच्या साह्याने आपण आपले calculation सहज आणि सोपे करू शकतो. पण त्यासाठी त्याचे आवश्यक फोर्मुले येणे आवश्यक आहे. पण काही फोर्मुले कसे वापरावयाचे याचे ज्ञान काहीवेळा अपुरे असते. या ठिकाणी या ब्लॉग द्वारे सर्व आवश्यक फोर्मुले देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे आपण सूचना देवू शकता.

SUM चा फोर्मुला 
हा फोर्मुला दोन किंवा अधिक सेल मधील संख्यांची बेरीज करण्यासाठी वापरला जातो.
जसे : जेथे RESULT हवा त्या सेल मध्ये क्लिक करा व तेथे = हे क्लिक करा व SUM हा शब्द TYPE करून ज्यांची बेरीज करावयाची आहे ते सर्व सेल निवडा.
किंवा
दुसरी पद्धत : RESULT च्या ठिकाणी "=" हे चिन्ह निवडा व जितक्या सेल ची बेरीज करावयाची त्या प्रत्येक सेल ला निवडा व + हे चिन्ह निवडून सेल निवडा पुन्हा + निवडून पुन्हा जितके सेल असतील तितके निवडा व प्रत्येक सेल च्या मध्ये + चिन्ह निवडा..
म्हणजेच
RESULT च्या सेल मध्ये "B3+C3+D3+E3" हे टाईप करा म्हणजे तुमच्या  "E5" मध्ये 100 उत्तर मिळेल.












______________________________________________________________________________
वजाबाकी चा फोर्मुला : 
या मध्ये दोन संख्यांची वजाबाकी आपण तिसऱ्या सेल मध्ये करू शकतो यां साठी आपणास पारंपारिक पद्धीतीने जसे वजाबाकी करतो तसेच येथे सुद्धा वजाबाकी करू शकतो.
जसे :  TOTAL च्या सेल मध्ये ज्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे त्यांच्या सेल ची वजाबाकी करा.
TOTAL मध्ये = चिन्ह दाबा. त्यानंतर मोठी संख्या - लहान संख्या निवडा , तुमचा REUSLT तुम्हाला मिळेल.
















__________________________________________________________________________
गुनाकाराचा फोर्मुला :
दोन संख्यांचा गुनाकाराचा फोर्मुला कसा वापरावा हे येथे दाखवले आहे.
जसे : जेथे TOTAL हवी तेथे = चिन्ह दाबा, पहिली संख्या (B3) * दुसरी संख्या  (C3) टाका म्हणजेच " =B3*C3 हा फोर्मुला टाका. म्हणजे त्या सेल मध्ये तुमचा RESULT मिळेल.


________________________________________________________________________________
भागाकाराचा फोर्मुला :
यामध्ये दोन संख्यांचा भागाकार कसा करावा हे दाखविले जाते.
जसे  : TOTAL मध्ये = चिन्हाचा वापर करा, व मोठी संख्या / लहान संख्या म्हणजेच दिलेल्या सेल मध्ये  "=B3/C3" या फोर्मुल्याचा वापर करावा लागेल म्हणजे दिलेल्या संख्येचा RESULT येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips