Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

बुधवार, १३ जुलै, २०१६

इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप : मराठी,इंग्रजी,हिंदी,उर्दू,कन्नड,गुजराती,तेलुगु,सिंधी माध्यमासाठी..

इयत्ता ५ वी व ८ वी  साठी माहिती भरण्यासाठी वेब पोर्टल झाले सुरु. इयत्ता पाचवी व आठवी साठी फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा. दि. ३१/१२/२०१६ नंतर विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्यासाठी रुपये ५०/-(प्रति विद्यार्थी ) अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. .
इयत्ता ५ वी ८ वी साठी शिष्यवृत्ती अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप...

सध्या इयत्ता ५ वी ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. पण त्यासाठीचा अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप जाहीर झाले नव्हते त्यामुळे सर्व शिक्षक ,पालक व व्यावसायिक यांना योग्य असा निर्णय घेता येत नव्हता. पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सदरचा अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप स्पष्ट केल्याने आता त्याचे सर्वांना योग्य त्या प्रकारे नियोजन करता येणार आहे.

परीक्षेचे स्वरूप : इयत्ता पाचवी व आठवी दोन्हीसाठी 
------------------------------------------------------------------------------------------
पेपर  विषय  प्रश्न संख्या  गुण  वेळ
प्रथम भाषा  २५ ५० १ तास ३० मिनिटे
गणित  ५० १००
एकूण  ७५ १५०
तृतीय भाषा  २५ ५० १ तास ३० मिनिटे
बुद्धिमत्ता चाचणी  ५० १००
एकूण  ७५ १५०
------------------------------------------------------------------------------------------
वरील विषयासाठी फक्त दोनच पेपर आहेत व प्रत्येक पेपर साठी दीड तासाचा कालावधी आहे.तसेच प्रश्नांची संख्या सुद्धा कमी असल्याने विद्यार्थांचा ताण कमी होणार आहे.

प्रश्नांची काठीण्य पातळी 
सोपे स्वरूपाचे प्रश्न : ३०%
मध्यम स्वरूपाचे प्रश्न : ४०%
कठीण स्वरूपाचे प्रश्न : ३०%
 वरील सर्व घटक ५ वी व ८ वी साठी आवश्यक असून खाली फक्त आठवी साठी जादा सूचना दिलेली आहे.
महत्वाचे : 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता आठवी ) साठीच्या प्रत्येक पेपर मध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक आहेत.


विषय  इयत्ता ५ वी  इयत्ता ८ वी 
मराठी  डाऊनलोड डाऊनलोड
गणित  डाऊनलोड डाऊनलोड
तृतीय भाषा  डाऊनलोड डाऊनलोड
बुद्धिमत्ता चाचणी  डाऊनलोड डाऊनलोड

मराठी व इतर माध्यामाच्या अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खालील tab open करा.
 
आता सध्या २०१६-२०१७ या वर्षासाठी इयत्ता पाचवी व सातवी साठी ऑनलाईन फॉर्म भरणे ची वेबसाईट सुरु झाली आहे.त्यासंदर्भातील सर्व माहिती भरण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.तसेच हि माहिती कशी भरावी हे दर्शविणारा व PDF फाईल येथे देत आहे.त्याचा वापर करून आपण आपल्या शाळेची माहिती भरावी.सदर माहिती प्रपत्र वाचून मगच आपल्या शाळेची माहिती भरावी.ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची वेळापत्रके.

अ.क्र. तपशील मुदत विलंब शुल्क  अतिविलंब शुल्क
५ वी/ ८ वी आवेदनपत्र भरणे ३१ डिसेंबर ७ जानेवारी १ फेब्रुवारी
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धीतीने शुल्क भरणे २ जानेवारी ९ जानेवारी  १ फेब्रुवारी
चलन अपडेट करून प्रपत्र प्रिंट काढणे. ३ जानेवारी  १० जानेवारी १ फेब्रुवारी


फॉर्म भरत असताना काही अडचण निर्माण झाल्या खालील क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधावा.


इयत्ता ५ वी इयत्ता ८ वी
मोबाईल  ७७२००९१००३ ८३८००४२००१
७७२००६९००६ ८३८००९४००८
७७२००५९००५ ८३८००८९००५
ई-मेल mscepup@gmail.com mscepss@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips