इयत्ता ५ वी ८ वी साठी शिष्यवृत्ती अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप...
सध्या इयत्ता ५ वी ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. पण त्यासाठीचा अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप जाहीर झाले नव्हते त्यामुळे सर्व शिक्षक ,पालक व व्यावसायिक यांना योग्य असा निर्णय घेता येत नव्हता. पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सदरचा अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप स्पष्ट केल्याने आता त्याचे सर्वांना योग्य त्या प्रकारे नियोजन करता येणार आहे.
परीक्षेचे स्वरूप : इयत्ता पाचवी व आठवी दोन्हीसाठी
------------------------------------------------------------------------------------------
| पेपर |
विषय |
प्रश्न
संख्या |
गुण |
वेळ |
| १ |
प्रथम भाषा |
२५ |
५० |
१ तास
३० मिनिटे |
| गणित |
५० |
१०० |
| एकूण |
७५ |
१५० |
| २ |
तृतीय भाषा |
२५ |
५० |
१ तास
३० मिनिटे |
| बुद्धिमत्ता चाचणी |
५० |
१०० |
| एकूण |
७५ |
१५० |
------------------------------------------------------------------------------------------
वरील विषयासाठी फक्त दोनच पेपर आहेत व प्रत्येक पेपर साठी दीड तासाचा कालावधी आहे.तसेच प्रश्नांची संख्या सुद्धा कमी असल्याने विद्यार्थांचा ताण कमी होणार आहे.
प्रश्नांची काठीण्य पातळी
सोपे स्वरूपाचे प्रश्न : ३०%
मध्यम स्वरूपाचे प्रश्न : ४०%
कठीण स्वरूपाचे प्रश्न : ३०%
वरील सर्व घटक ५ वी व ८ वी साठी आवश्यक असून खाली फक्त आठवी साठी जादा सूचना दिलेली आहे.
महत्वाचे :
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता आठवी ) साठीच्या प्रत्येक पेपर मध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक आहेत.
मराठी व इतर माध्यामाच्या अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खालील tab open करा.
आता सध्या २०१६-२०१७ या वर्षासाठी इयत्ता पाचवी व सातवी साठी ऑनलाईन फॉर्म भरणे ची वेबसाईट सुरु झाली आहे.त्यासंदर्भातील सर्व माहिती भरण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.तसेच हि माहिती कशी भरावी हे दर्शविणारा व PDF फाईल येथे देत आहे.त्याचा वापर करून आपण आपल्या शाळेची माहिती भरावी.सदर माहिती प्रपत्र वाचून मगच आपल्या शाळेची माहिती भरावी.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची वेळापत्रके.
| अ.क्र. |
तपशील |
मुदत |
विलंब शुल्क |
अतिविलंब शुल्क |
| १ |
५ वी/ ८ वी आवेदनपत्र भरणे |
३१ डिसेंबर |
७ जानेवारी |
१ फेब्रुवारी |
| २ |
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धीतीने शुल्क भरणे |
२ जानेवारी |
९ जानेवारी |
१ फेब्रुवारी |
| ३ |
चलन अपडेट करून प्रपत्र प्रिंट काढणे. |
३ जानेवारी |
१० जानेवारी |
१ फेब्रुवारी |
फॉर्म भरत असताना काही अडचण निर्माण झाल्या खालील क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधावा.