ऑनलाइन
पेमेंट करण्यासाठी घ्यावयाची काळजी?
आपण सध्या रिचार्ज पासून
मोठ मोठ्या वस्तु खरेदी करेपर्यंत आता ऑनलाईन पेमेंट चा वापर जास्तीत जास्त करतो.
शिवाय कोणालाही पैसे पाठवण्यासाठी आपण ऑनलाइन पेमेंट चा वापर करतो. तर अशा
ऑनलाइन पेमेंट संदर्भात हा लेख लिहिण्याचा प्रपंच.
ऑनलाइन
पेमेंट नेमके काय आहे?
आपण दोघांमध्ये जो व्यवहार
करतो तो व्यवहार पैशाच्या स्वरूपात असेल आणि कोणत्याही पैसे वाहतूक करण्यापेक्षा
तो एकमेकाच्या खात्यावर वर्ग करण्याचा इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे ऑनलाईन पेमेंट.
सध्या अशा पेमेंटचा जास्त बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय त्याबरोबर
पैसे चोरीला जाण्याच्या बातम्याही आपण ऐकत असतो.
पैसे
चोरीला जाण्याचे प्रकार नेमके होतात कसे?
सध्या आपण वेगवेगळ्या
वेबसाईटच्या लिंक पहात असतो. त्यामध्ये खूप कमी रकमेचे फरक आहे असे सांगितले
जाते. अशा प्रकारच्या ऑफर असतात का? तर याचे उत्तर आहे असतात. पण यासाठी ऑनलाईन
पेमेंट आपणास करावे लागते. अशा प्रकारच्या ऑनलाइन
पेमेंट आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड व नेट बँकिंग अशा पद्धतीने वापरत असतो.
आपल्या कार्ड ची माहिती जर कोणाकडे असेल तर तो आपल्या खात्यावरील पैसे काढून
घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याला
आपल्या सिमकार्डवर येणारा otp जर मिळाला तरच तो आपले पैसे काढून घेऊ शकतो अन्यथा तो काढून घेऊ शकत
नाही. काही वेळेस आपणाकडे बँकेतून फोन आला असे भासवून अशा प्रकारची otp ची
माहिती विचारली जाते. त्यावेळी लक्षात घ्यावे की बँक अशा प्रकारच्या ओटीपी ची माहिती ग्राहकास
कधीही विचारत नाही. अशा अशाप्रकारचा otp आपण जर
तिला तर आपल्या खात्यावरील रक्कम चोरीला जाऊ शकते.
ऑनलाइन
व्यवहार करायचा आहे, पण अशा प्रकारची रिस्क
घ्यायची नाही? तर काय करावे?
आपणास अशा ऑनलाईन
व्यवहारासाठी एक वेगळे खाते ठेवावे लागेल. त्यामध्ये जितकी खरेदी करावी
तितकीच रक्कम आपण ठेवून असा व्यवहार करू शकतो. म्हणजे आपले इतर व्यवहाराचे खाते वेगळे आणि ऑनलाईन व्यवहाराचे
खाते वेगळे असे आपल्याला विभागावे लागेल. त्यासाठी ऑनलाईन व्यवहाराचे खाते
हे शून्य ब्यालंस चे खाते म्हणून वापरायचे आहे. नजीकच्या कोणत्याही बँकेत 0 रकमेवरील
खात्याची ऑफर सुरू असेल तर ते खाते
निसंकोच सुरु करावे. ज्यावर आपण फक्त ऑनलाईन
खरेदी किंवा इतर ऑनलाईन व्यवहार करणार आहोत. अशा प्रकारच्या खात्यावरील
माहिती जरी कोणाच्याही हातात पडली तरी आपण हे खाते इतर व्यवहारासाठी वापरत
नसल्याने अशा प्रकारच्या खात्यावर जास्त ब्यालंस ही नसल्याने कमीत कमी रक्कम
आपल्या खात्यातून गेली तरी त्याची जोखीम कमी होते. आपला इतर खात्यावरील
बॅलेंस सुरक्षित राहतो. ज्या खात्यावरून आपण मोठ्या
रकमेचे व्यवहार करतो त्या खात्यावर
तुम्ही सहसा ऑनलाईन व्यवहार करू नये.
तुम्हाला ऑनलाईन व्यवहाराचे सुरक्षिततेचे सर्व नियम माहित होईपर्यंत
आपण छोट्या रकमेचे व्यवहार झिरो balance खात्यावरील बँकेच्या
माध्यमातूनच करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा