Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

रविवार, २२ जानेवारी, २०१७

आपले लेखन बालभारती साठी : आपल्या लेखनास द्या बळ ,स्थान मिळवा बालभारती पाठ्यपुस्तकामध्ये


आपणास लेखन करण्याची जर आवड असेल आणि आपण जर एखाद्या उत्कृष्ट विषयावर जर लिहू शकत असाल तसेच आपला विषय सुद्धा जर त्या तोडीचा असेल तर नक्कीच तुमचे लेखन बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये झळकेल. आज सोशल मिडीयावर जर पहिले तर आपणास सर्वसाधारण व्यक्तीमध्ये किती कवी आणि लेखक दडलेले आहेत हे लगेच समजून येते.याच धर्तीवर बालभारतीने अशा व्यक्तींना संधी देण्यास एक पाउल टाकले आहे.
   तुम्ही जर लेखन करत असाल तर आताच आपले लेखन बालभारतीकडे पाठवण्यास हरकत नाही.

बालभारती या शासकीय संस्थेने इयत्ता सातवी व नववी च्या पाठ्य पुस्तकासाठी "एकांकिका पाठवा" असे निवेदन केले आहे.

  • तुम्ही कोणीही असा , तुम्हाला सदर एकांकिका पाठवता येईल.
  • एकांकिका मराठी/इंग्रजी/हिंदी या भाषेत असाव्यात.
  • तुम्ही तीन एकांकिका एका वेळी पाठवू शकता, तीन पेक्षा जास्त नकोत.
  • समितीचा निर्णय अंतिम राहील.
  • सदर एकांकिका या सातवी व नववी च्या पाठ्य पुस्तकात निवडण्यात येत असल्याने यांना अनुसरून विषय व लांबी निवडावी.
  • सदर एकांकिका हि शिक्षकांनी स्वतः लिहिलेली असावी.
  • एकांकिका खालील पोइंट नुसार पाठवावी.
  • हाताने लिहिलेली असल्यास स्कॅन करून त्याची PDF बनवावी, किंवा Type केल्यास त्याची PDF बनवावी.
  • सदर एकांकिका २७ जानेवारी २०१७ पर्यंत balbharati.ekankika@gmail.com  या इमेल वर पाठवून द्यावी.
  • या सोबत प्रमाणपत्र पाठवावे अन्यथा एकांकिका ग्राह्य धरली जाणार नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips