Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

विभागीय शिक्षणाची वारी 2016 पुणे , नागपूर व औरंगाबाद येथे..

‘शिक्षणाची वारी’ यंदा पुणे, नागपूर औरंगाबादमध्ये होणार
मुंबई, ३ नोब्हेंबर : प्रयोगशील आणि कृतीशील शिक्षकांना त्यांच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाने सुरु केलेला 'शिक्षणाची वारी' हा अभिनव उपक्रम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुणे, नागपूर व औरंगाबद येथे तीन टप्प्यात आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे येथे २८ ते ३० नोव्हेंबर, दुस-या टप्प्यात नागपूरमध्ये १२ ते १४ डिसेंबर आणि तिस-या टप्प्यात औरंगाबाद येथे २३ ते २५ जानेवारीमध्ये होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुण्यातील शिक्षणाच्या वारीला शिक्षकांसह नागरिकांनीही उदंड प्रतिसाद दिला होता. दररोज १८०० शिक्षक याप्रमाणे साडेसात हजार शिक्षकांनी वारीला भेट दिली होती. या शिक्षकांव्यतिरिक्त प्रयोगशील-कृतीशील व हौशी शिक्षकांसह सुमारे १० हजार शिक्षणप्रेमींनी वारीचा लाभ घेतला होता. शिक्षणाच्या वारीत खाली नमूद केलेल्या लिंकमधील विषयांवर आधारित निवडक ५० प्रयोगशील शिक्षक सहभागी होतील. या प्रयोगशील शिक्षकांना तिन्ही ठिकाणच्या वारीत आपले प्रयोग सादर करण्याची संधी मिळणार आहे. शिक्षकांनी त्यांच्या शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात राबविलेले नाविन्य उपक्रम आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला ते राज्य पातळीवर नेण्याची संधी देवू. या लिंकवरील फॉर्म भरून https://www.research.net/r/wari2016 आपला सहभाग नोंदवावा.
Whatsapp वरून साभार...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips