राज्याने मागील वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यास शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्याच्यात महाराष्ट्रातील शिक्षक कमी दिसतात. शिक्षकांचा हा उत्साह पाहूनच राज्य शासनाला राज्यातील शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचा निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे. राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची यानिमित्ताने आपणास संधी मिळाली. सुरुवातीस १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावयाच्या ठरविण्यात आले असून उत्साही, मेहनती, नित नवीन शिकणारे आणि समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवणारे शिक्षक, ज्यांची शाळा संकल्पना पत्रात दिलेले निकष पूर्ण करतात त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संकल्पना पत्र (Concept Note) विद्या प्राधिकरणाच्या www.mscert.org.in पाहता येईल.
तर दिपस्तंभ शाळेसाठीचे निकष पूर्ण करणा-या शाळांनी https://www.research.net/r/maharashtrainternationalschools या लिंकवर दि. ९ डिसेंबर २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
Whatsapp वरून साभार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा