Lookup हे Function अशा ठिकाणी वापरतात ज्या ठिकाणी आपणास दोन किंवा
तीन सेल मधील माहिती हि एका महितीच्या आधारे दर्शविली जाते.
जसे आपण विद्यार्थी रजिस्टर क्रमांक व विद्यार्थ्याचे नाव हे दोन
वेगवेगळ्या सेल मध्ये असेल आणि आपण जर दोनच सेल मध्ये हा सर्व data एका माहितीच्या
आधारे आपण पाहू शकतो.
माहितीची फाईल कशी बनवावी ?
- प्रथम एका सेल मध्ये रजिस्टर क्रमांक(A1) व दुसऱ्या (B1) सेल मध्ये विद्यार्थी नावे टाकावीत.
- यामध्ये कितीही नावे व रजिस्टर क्रमांक टाकले तरी चालतील.
- ज्या ठिकाणी आपणास नावे हवी आहेत त्या ठिकाणी आपण या LOOKUP चा वापर करू शकतो.
- F1 सेल मध्ये रजिस्टर क्रमांक हे हेड व F2 सेल मध्ये नाव हे हेड टाकावे.
- आता G1 सेल मध्ये कोणताही एक रजिस्टर क्रमांक टाका व G2 सेल मध्ये "=LOOKUP(G1,A3:B8)" हा फोर्मुला टाकावा.
- यामध्ये G1 हा ENTRY सेल म्हणून वापरला जाईल व A3:B8 हा सर्व REFERANCE AREA असल्याने जो भाग आपणास LOOKUP मध्ये घ्यावयाचा आहे तो सर्व भाग येथे घेणे आवश्यक आहे. येथे वरील हेड घ्यावयाचा नाही ह्याची काळजी घ्यावी.
- आता G1 मधील रजिस्टर क्रमांक बदलल्यास आपणास त्या रजिस्टर क्रमांकास ज्याचे नाव आहे ते नाव दिसेल.
- अधिक माहितीसाठी खालील चित्र स्वरूपातील माहिती पहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा