Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

फसव्या लिंक्स कशा ओळखाव्या आणि त्यापासून कसे सुरक्षित रहावे?


खरी ऑफर कशी शोधावी ?खूप स्वस्तातील ऑफर उपलब्ध असतात का?  त्या शोधणे इतके सोपे आहे का ? अशा ऑफर तुम्हास समजणार कशा आणि त्या तुम्ही उपलब्ध करणार कशा? खोट्या लिंक्स ओळखाव्या कशा? ऑफर आली आहे आणि ती घ्यायची इच्छा आहे मग ती apply काशी करावी?

आपणास खरी ऑफर कशी शोधावी हे ओळखण्यासाठी चा हा लेख प्रपंच,
खूप स्वस्तातील ऑफर उपलब्ध असतात का ?
तर याचे उत्तर आहे असतात,पण त्या शोधणे इतके सोपे आहे का ?
याचे उत्तर आहे
नाही....
मग अशा ऑफर तुम्हास समजणार कशा आणि त्या तुम्ही उपलब्ध करणार कशा?
आशा ऑफर्स आपनास मित्रांनी पाठवलेल्या शेअर लिंक द्वारे मिळू शकतात. किंवा काही वेबसाईट्स आशा ऑफर्स दाखवतात.
पण काही लिंक्स या खोट्या आणि फसव्या असतात ज्या तुम्हाला ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या नकली व हुबेहूब दिसणाऱ्या वेबसाईटवर नेतात आणि तेथून तुमच्या payment डिटेल्स घेतात , आपणही कोणतीही शहानिशा न करता आपल्या डिटेल्स देतो . आणि नंतर आपल्या कार्ड वरून गेलेल्या पैशासाठी बँकेला जबाबदार पकडतो. येथे बँक जबाबदार नाही तर आपण जबाबदार असतो . पण काही वेळस ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी व ग्राहक टिकवण्यासाठी बँक हा बुरदण्ड सोसू शकते पण प्रत्येक वेळी नाही.
हा लेख व त्या संदर्भात असणारे लेख http://www.eschool4u.in येथे पाहू शकता.
आशा लिंक्स ओळखाव्या कशा?
जर ऍमेझॉन या वेबसाईट वर एखादी ऑफर असेल व ती लिंक मोठी असेल तरिही ही लिंक सुरुवातीला https अशी सुरुवात दाखवेल. त्यानंतर त्याची सुरुवात
https://www.amazon.in
अशीच झाली असेल याव्यतिरिक्त असेल तर ती लिंक fake आहे हे ओळखावे. किंवा त्याची सुरुवात amzn.to या short लिंक ने झाली असेल. या सर्व लिंक्स खात्रीशीर आहेत.
ऑफर आली आहे आणि ती घ्यायची इच्छा आहे मग ती apply काशी करावी?
एखादी लिंक प्राप्त झाली प्रथम त्या लिंकची वरील प्रमाणे सत्यता तपासावी आणि त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती वस्तू Add to cart करावी. आता तुम्हाला ही प्रक्रिया बंद करायची आहे. म्हणजे हे इंटरनेट पेज close करा. आता तुम्ही ज्या  वेबसाईट वर Add to cart केले आहे त्या वेबसाईटवर डायरेक्त जा . (येथे मात्र व्हाट्सएपच्या लिंक वरून जाऊ नका. ) आणि तुमच्या cart मध्ये पहा तुम्ही मघाशी add केलेला प्रॉडक्ट जर आता येथे दिसला तर तुम्ही ती ऑफर घ्यायला हरकत नाही.
तुम्हाला आशा प्रकारच्या ऑफर सापडत नसतात यासाठी काही शैक्षणिक वस्तूसाठी आम्ही डायरेक्त लिंक आमच्या खलील वेबसाईटवर दिल्या आहेत . त्याचा तुम्ही वापर करू शकता.
सध्या जितक्या वेबसाईट आहेत आणि त्याच्या ज्या ऑफर्स सुरू आहेत त्या सर्व खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला पहावयास मिळतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips