Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

रविवार, १७ एप्रिल, २०१६

IF या फोर्मुल्याचा वापर कसा करावा?

आपण आज IF या फोर्मुल्याचा कसा वापर करावा याविषयी माहिती घेणार आहोत


IF हा फोर्मुला कोणकोणत्या ठिकाणी वापरतात?

ज्या ठिकाणी जर , तर हे शब्द प्रयोग वापरून काही कमांड दिल्या जातात त्या ठिकाणी IF या फोर्मुल्याचा वापर करतात. सर्व साधारण पणे निकाल पत्रक बनवताना या फोर्मुल्याचा वापर करताना दिसतो.

 जर ९० व त्यापेक्षा जास्त गुण असतील तर “अ” श्रेणी
हा फोर्मुला थोडक्यात विस्तारित
  
=IF(C4>90,”अ”) यामध्ये हा फोर्मुला वाचताना =(इज इक्वल टू) इफ C4(हा आपण निवडलेला सेल) हा ९० पेक्षा जास्त अंकाचा असेल तर “अ” हा शब्द Result मध्ये यावा.याच्या मध्ये (,) स्वल्पविराम ची अत्यंत आवश्यकता आहे कारण हा नसेल तर येथे ERROR येईल.
     
    यामध्ये ९० च्या पुढील संख्या गृहीत धरली जाईल. येथे IF या शब्दानंतर “(“ हा कंस खुला केला व त्यानंतर सर्व कमांड देवून “)” हा कंस बंद केला गेला. येथे कंस खुला व बंद केल्याशिवाय व स्वल्पविराम दिल्याशिवाय if चा फोर्मुला कार्य करीत नाही. म्हणून लक्षात ठेवा कि जितके कंस खुले केले तितके बंद करावेच लागतील.

, जर ८० व त्यापेक्षा जास्त गुण असतील तर “ब” श्रेणी,

हा फोर्मुला थोडक्यात विस्तारित


  =IF(C4>80,”ब”) यामध्ये हा फोर्मुला वाचताना =(इज इक्वल टू) इफ C4(हा आपण निवडलेला सेल) हा ८० पेक्षा जास्त अंकाचा असेल तर “ब” हा शब्द Result मध्ये यावा. याच्या मध्ये (,) स्वल्पविराम ची अत्यंत आवश्यकता आहे कारण हा नसेल तर येथे ERROR येईल. यामध्ये ८० च्या पुढील संख्या गृहीत धरली जाईल. येथे IF या शब्दानंतर “(“ हा कंस खुला केला व त्यानंतर सर्व कमांड देवून “)” हा कंस बंद केला गेला.

  जर ७० व त्यापेक्षा जास्त गुण असतील तर “क” श्रेणी हि याच प्रकारे लिहिली जाते.

या ठिकाणी आपण एका श्रेणीला वेगवेगळे if चे फोर्मुले देवून पहिले , आता हे सर्व फोर्मुले एकत्र जर एकच सेल मध्ये घ्यावयाचे असतील तर “(“ कंस प्रत्येक वेळी खुला करावा लागेल व सर्वात शेवटी सर्व खुले केलेले कंस एकदमच बंद करावे लागतील.याला अनुसरून आपला फोर्मुला खालीलप्रमाणे असेल.
=IF(C4>90,”अ”,IF(C4>80,”ब”,IF(C4>70,”क”)))

येथे जर C4 मधील संख्या ९० च्या पुढील असेल तर “अ” हि श्रेणी Result मध्ये येईल.पण या ठिकाणी ८० गुणाची श्रेणी पण घ्यावयाची असल्याने हा कंस पूर्ण करणार नाही तर त्यासाठी (,) स्वल्पविराम देवून दुसऱ्या फोर्मुल्यास सुरुवात केली. या प्रकारे ७० गुणांची श्रेणी फोर्मुला टाकावा . आता डाव्या बाजूचे जितके कंस दिले आहेत तितके कंस शेवटी पूर्ण करावेत.म्हणजे जी अट पूर्ण करेल त्याचा Result फोर्मुला टाकलेल्या सेल मध्ये दर्शवेल.
यापैकी काहीच अट पूर्ण होत नसेल तर काय ?

ज्यावेळी आपण सर्व फोर्मुला टाकतो म्हणजे आपण त्या सेल ला अट देत असतो आणि त्याने जर ती अट पूर्ण केली तरच त्या अटीचा Result फोर्मुला टाकलेल्या सेल मध्ये मिळतो. पण जर टाकलेल्या कोणत्याच अटी जर दिलेला फोर्मुला पूर्ण करीत नसेल तर .........
वरील उदा. अनुसरून
जर ९० च्या पुढे गुण असतील तर “अ”, जर ८० च्या पुढे गुण असतील तर “ब” , जर ७० च्या पुढे गुण असतील तर “क” , अशी आपण त्याला अट दिलेली आहे पण C4 सेल मध्ये जर ७० व त्यापेक्षा खालील गुण असतील तर त्याला “इ” श्रेणी द्यावयाची असेल तर खालीलप्रमाणे फोर्मुला असणे आवश्यक आहे.
 =IF(C4>90,”अ”,IF(C4>80,”ब”,IF(C4>70,”क”,”इ”)))

Enter हे बटण दाबलेनंतर योग्य तो Result मिळेल.


आपला निकाल खालील अटी नुसार असतो.
९१ ते १०० -à अ१
८१ ते ९० --à अ२
७१ ते ८० ---à ब१
६१ ते ७० --à ब२
५१ ते ६० --à क१ 
४१ ते ५० --à क२
३१ ते ४० --à
२१ ते ३० --à इ१
            नाहीतर इ२
वरीलप्रमाणे अटी जर असतील तर त्याचा फोर्मुला खालील प्रमाणे दर्शविला जातो.
=IF(C4>90,”अ१”,IF(C4>80,”अ२”, IF(C4>70,”ब१”, IF(C4>60,”ब२”, IF(C4>50,”क१”, IF(C4>40,”क२”, IF(C4>30,”ड”, IF(C4>20,”इ१”,”इ२”))))))))
येथे प्रत्येक फोर्मुल्याचा कंस खुला केला आहे आणि सर्वात शेवटी तो बंद केला आहे तसेच “ई१” हि अट पूर्ण केल्यानंतर शेवटची अट शिल्लक राहिल्यानंतर ती लगेचच लिहिली त्यामुळे ती सुद्धा लगेचच लागू पडेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips