आपणास काही ठिकाणी दशांश संख्यांना पूर्ण अंकी संख्येत रुपांतर करण्यासाठी round या फोर्मुल्याचा वापर करतात.
ROUND चा वापर
- जर F11 या सेल मध्ये 24.60 हि संख्या असेल तर
- G11 या सेल मध्ये त्याची पूर्ण संख्या साठी खालील फोर्मुला वापरावा.
- G11 मध्ये क्लिक करावे.
- " =ROUND(F11*1,0) " या फोर्मुल्याचा वापर करावा.
- यामध्ये संख्या जर 0.5 च्या पुढे असेल तर पुढील पूर्णांक व 0.5 च्या मागे असेल तर मागील पूर्ण संख्या येईल.
ROUNDUP व ROUNDDOWN चा वापर
- जर कोणतीही संख्या पुढील पूर्णांकात घ्यायची असेल तर खालील ROUNDUP फोर्मुल्याचा वापर करावा.
- त्यानंतर स्वल्पविराम देवून किती दशांश स्थळापर्यंत संख्या हवी तो अंक लिहावा.
- =ROUNDUP(F11,0) याठिकाणी 0 म्हणजे पूर्णांक संख्या होय.
- किंवा
- =ROUNDUP(F11,2) याठिकाणी 2 म्हणजे दोन दशांश स्थळापर्यंत संख्या दर्शवते.
जर कोणतीही संख्या मागील पूर्णांकात घ्यावयाची असेल
- तर ROUDNDOWN चा वापर करतात.
- त्यानंतर स्वल्पविराम देवून किती दशांश स्थळापर्यंत संख्या हवी तो अंक लिहावा
- =ROUNDDOWN(F11,0) या ठिकाणी पूर्ण अंकी संख्या मागील दशांश अंकापर्यंत येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा