आपणास जर एखादी संख्या पूर्णांकात घ्यावयाची असेल तर आपण त्यासाठी Round चा फोर्मुला वापरत होतो. पण जर आपणास एखादी संख्या पुढील पूर्णांकात नव्हे तर पुढील दशकात हवी असेल तर आपण त्यावेळेस ceiling चा फोर्मुला वापरू शकतो.
उदा. मागील सहाव्या वेतन आयोगामध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार १०३२२ रु. असेल तर त्याला १०३३० करण्यासाठी =CEILING(10322,10) या फोर्मुल्याचा वापर केला जातो.
जर आपणास हीच संख्या पुढील शतकामध्ये घ्यावयाची असेल तर " =CEILING(10322,100) " या फोर्मुल्याचा वापर करतात. त्यामुळे आपणास त्यापुढील RESULT पुढील शतकात म्हणजेच "१०४००" हे उत्तर मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा