आपणास काही वेळेस लिखित स्वरूपातील फोर्मुले सुद्धा कसे वापरावेत हे समाजत नाहीत अशावेळेस तुम्हाला या images मदत करतील..
आजची दिनांक व वेळ कशी काढावी... NOW FORMULA
ज्या सेल मध्ये आपणास result हवा त्या सेल मध्ये खालील फोर्मुले टाका , अपोआप result मिळेल.
= NOW( ) हा फोर्मुला टाकल्यानंतर आपणास आताची दिनांक व वेळ लगेचच दाखवेल हा दिनांक व वेळ ज्या वेळी तुम्ही हा निकाल पाहणार त्या वेळेचाच दाखवेल.
उदा. आज दिनांक टाकल्यानंतर आजचे दिनांक व वेळ दाखवेल व उद्या पाहिलेनंतर आपणास उद्याचा दिनांक व तेव्हाची वेळ दाखवेल.
TODAY
जर तुम्हाला आजचा दिनांक फक्त हवा असेल तर खालील फोर्मुला टाका.
=TODAY( ) तुम्हाला तुमची आताची तारीख मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा