Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

लॅपटॉप ‘Yoga 700’ लॉन्च - Yoga 700 Launch

लॅपटॉप 'Yoga 700' लॉन्च

💻💻💻💻💻💻
लेनोव्हाने शुक्रवारी आपल्या 'Yoga 700' लॉन्च केला. 11 इंच आणि 14 इंचाच्या स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप लिनोव्हाने लॉन्च केला असून 11 इंच व्हेरिएंटची किंमत सुमारे 42 हजार 400 रुपये, तर 14 इंचाच्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 52 हजार 200 रुपये असेल. ही किंमत अमेरिकेतील ग्राहकांसाठी असणार आहे. भारतीय बाजारात या लॅपटॉपची किंमत किती असेल, याबाबत अद्याप लेनोव्होकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
'Yoga 700' लॅपटॉप चार वेगवेगळ्या पद्धतीने ऑपरेट करता येणार आहे. लॅपटॉप, टॅब्लेट, टेंट आणि स्टँड या चार प्रकारात हा लॅपटॉप वापरता येऊ शकेल. दोन्ही व्हेरिएंटच्या लॅपटॉपमध्ये विंडोज 10 आहे आणि ऑडिओसाठी यामध्ये डॉल्बी DS 1.0 होम थिएटर टेक देण्यात आला आहे.
➡14 इंचाच्या 'Yoga 700'
चे फीचर्स:
लेनोव्हो 'Yoga 700'चा 14 इंचाचं मॉडेल पूर्ण एचडी 10 पॉईंट मल्टी-टच IPS डिस्प्लेवाला आहे. यामध्ये सिक्स्थ जनरेशन इंटेल कोर i7 प्रोसेसर आहे. याशिवाय यामध्ये इंटेल एचडी ग्राफिक्स 520 आणि 8 जीबी DDLR 3L रॅम देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये Nvidia GeForce GT 940M discrete GPU लावण्याचा पर्याय युजर्सकडे असणार आहे. 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज असून वेबकॅमही एचडी क्वालिटीचा दिलेला आहे. कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचं तर, वाय-फाय, ब्लूटूथ 4.1, यूएसबी 3.0, कार्ड रीडर आणि HDMI (720p) देण्यात आला आहे. बेस मॉडेलचं वजन 1.6 किलो आहे आणि यामध्ये 45Whr ली-पॉलिमर बॅटर आहे.

➡11 इंचाच्या 'Yoga 700'
चे फीचर्स:



11 इंचाच्या लेनोव्हो 'Yoga 700'चे फीचर्स अद्याप जाहीर केले गेलेले नाहीत. मात्र, ऑस्ट्रेलियन वेबसाईटवर या लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स दिले आहेत. त्यानुसार 11.6 इंचाच 10 पॉईंट टच-स्क्रीनचा पूर्ण एचडी डिस्प्ले या लॅपटॉपला दिला आहे. 64-bit Intel Core m3-6Y30 प्रोसेसर असलेला हा लॅपटॉप 128 जीबीचा SSD स्टोरेज देण्यात आला आहे. याचं वजन 1.1 किलो आणि 40 Whr ली पॉलिमर बॅटरी दिली असून तिची क्षमता 7 तासांची आहे.
लेनोव्होचे सिनिअर व्हॉईस प्रेसिडेंट जॉन्सन जिया यांनी सांगितले की, "आम्हाला माहित आहे की लॅपटॉपचा परफॉर्मन्स, पोर्टेबल, उत्तम साऊंड सिस्टम आणि डिस्प्लेसारखे फीचर्स ग्राहकांना हवे असतात. त्यामुळेच या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच Yoga 700 ची निर्मिती करण्यात आली आहे."
🙏🏼🙏🏼💻📱💻🙏🏼🙏🏼
आपला तंत्रस्नेही
Shared from what's app

1 टिप्पणी:

  1. विध्यार्थी पोर्टल मध्ये hm लोगिन ला specal charecatar टाकले आहे त्यामुळे file उपलोड करताना प्रोब्लेम येत आहे काय करावे

    उत्तर द्याहटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips