Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, २ जुलै, २०१५

बाबा....


बाबा ...
लहान असल्यापासुन आई मुलांना सांगत असते ....... इथे जाऊ नको- बाबा मारेल,
तिथे जाऊ नकोस -बाबा मारेल,
झाडावर चढू नको- बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको- बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर- बाबा मारेल,
अभ्यासाला बस नाही तर- बाबा मारेल,

हे करू नको बाबा मारेल , ते करू नको बाबा मारेल मग मुलं सुद्धा बाबाला घाबरतात,
बाबाच्या भयाने शाळेत जातात बाबाने मारू नये म्हणून.
अभ्यास करतात बाबाच्या दहशतीखाली शिकत राहतात.
हळू हळू मुलं बाबा कडे दुर्लक्ष करून आई वरच प्रेम करू लागतात मना मधून बाबाला करून टाकतात वजा.
आईच्या चरणावर सर्वस्व अर्पण करतात. बाबा पासून चार हात लांबच राहतात. मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात,
कोणतच मुल बाबाला........ दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही,
वासरांची गाय म्हणत नाही.
बाबा साठी मुलाकडे शब्दच नसतात.
मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.
स्वामी तिन्ही जगाचा "बाबाविना" भिकारी होत नाही .
साने गुरुजीनाही "श्यामचा बाप" दिसत नाही.
आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं; मुलांना बाप घरात असला कि मात्र स्मशान शांतता.
शप्पथ सुद्धा आईचीच घेतात मुलं.
बाबा शप्पथेच्या हि लायकीचा नसतो.
बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये "नावापुरता".
मुलं विठोबाला माउली म्हणतात,
बाबासाहेबांना भिमाई म्हणतात
धरणीला माय म्हणतात, आणि देशाला माता म्हणतात. बाप मात्र धरणीतून , देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार.........
बाप असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा.
बाप असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.
बाबा म्हणजे केवळ पैसे कमवण्याचे यंत्र. तेवढं काम त्याने केलं कि त्याचं कर्तुत्व संपलं.
असं असुनही बाबा गेल्यावर............मुलांच्या छातीत धडकी का भरते?
का बरसतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस?
का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी ?
का वाटत मुलांना कि आपण बेवारस झालोय ?
का हंबरतात मुलं बाबा गेल्यावर?
का मुलं घाबरतात बाप गेल्यावर?
कथा-कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाप......... प्रत्यक्षात जेव्हा नसताे... तेव्हा का वाटत मुलांना कि,
...बाबा...आज असता तर बरं झालं असतं...!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips