रजेचे नाव आणि नियम |
किती दिवस |
शेरा |
अर्जित रजा (पूर्ण पगारी) |
३०० दिवस |
प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या
दिवशी प्रत्येकी १५ दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्त्यात अर्जित रजा आगाऊ जमा
होते. |
(Earned Leave) |
(एका वेळी सलग १८० दिवस) |
एकूण कामाचे दिवस गुणीले १/११= येणारे दिवस. |
(नियम ५० अन्वये) |
|
(३०० दिवसापर्यंत रजा खात्यात जमा करुन ठेवता येते.) |
अर्ध वेतनी रजा (Half pay Leave) |
सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी २० दिवस |
प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या
दिवशी, प्रत्येकी १० दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्त्यात आगाऊ
जमा होते. यात निलंबन काळ धरू नये. |
(नियम ६० अन्वये) |
||
परिवर्तीत रजा (Commuted Leave) |
देय असलेल्या अर्ध वेतनी रजेच्या निम्मे दिवस |
देय अर्धपगारी रजा दुप्पट खर्ची टाकुन परिवर्तीत रजा मिळते. कमाल ९० दिवस. (एकूण उपभोगलेली रजा ही अर्ध वेतनी रजेच्या दुप्पट
दिवस खर्ची पडेल) |
(नियम ६१ अन्वये) |
||
अनिर्जित रजा (Leave not due) |
वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास, जेवढी अर्ध वेतनी रजा
अर्जित होण्याची शक्यता असेल तितके दिवस |
एकूण सेवेत कमाल ३६० दिवस. |
(नियम ६२ अन्वये) |
एका वेळेस ९० दिवस. संपूर्ण सेवा काळात कमाल १८० दिवस. |
|
असाधारण रजा |
तीन वर्ष सतत सेवा पूर्ण – |
रजा खात्यावर कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तर किंवा विनंती वरुन. वैद्यकीय
प्रमाणपत्र आवश्यक. |
(Extraordinary
Leave) |
६ महिने. |
|
(नियम ६३ अन्वये) |
पाच वर्ष सतत सेवा पूर्ण – १२ महिने. |
|
|
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमाणपत्रावर मानसिक आजार, कर्करोग
ई. साठी – १८ महिने. |
|
परिविक्षाधीन कर्मचार्यास रजा (Leave on Probation) |
-- |
अनुज्ञेय रजा मिळण्याचा हक्क असेल. |
(नियम ६४ अन्वये) |
त्यापेक्षा जास्त रजा घेतल्यास परिविक्षाधिन काळात वाढ केली जाईल. |
|
निवृत्तीपूर्व रजा |
सलग १८० दिवस किंवा एकूण सेवा कालात २४ महिने. |
नियत सेवा निवृत्तीच्या तारखेपलिकडे जाणार नाही ही दक्षता घेऊन कमाल १८०
दिवस. कमाल २४ महिने. |
(Leave to
Preparatory to Retirement) |
||
(नियम ६६ अन्वये) |
||
प्रसूती रजा |
कायम सेवेत असणार्या महिला कर्मचार्यास, दोनपेक्षा कमी मुले हयात
असतील तर अर्जाच्या तारखेपासून १८० दिवस. |
¨अनाथ मुल दत्तक घेणार्या महिला
कर्मचार्यास - ९० दिवस विशेष रजा
अनुज्ञेय आहे. |
(Maternity
Leave) |
किमान सेवेची अट रद्द करण्यात आली आहे. दोन वर्षापेक्षा कमी
सेवा झालेल्या महिला कर्मचार्यास सहा महिन्याच्या वेतनाच्या रकमेइतका बाँड
द्यावा लागेल. |
¨सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या
आपतत्त्याचे संगोपन करण्यासाठी
महिला कर्मचार्यास आपत्त्याच्या जन्म दिनांकापासून - १८० दिवस. |
(नियम ७४ अन्वये) |
|
सेवा कालात एकदाच अनुज्ञेय आहे. अशा महिला कर्मचार्यास आपत्य नसावे तसेच
तिने मुल दत्तक घेतलेले नसावे. |
गर्भपात रजा |
वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक. |
सहा आठवड्यापेक्षा जास्त होणार नाही इतकी रजा. |
(नियम ७४(५) अन्वये) |
||
अपघाती/विशेष विकलांगता रजा |
पदाची कर्तव्ये पार पाडतांना अनुज्ञेय |
¨अपघाती रजा २४ महिन्यांपेक्षा
अधिक नाही इतकी रजा मिळण्याचा हक्क
असेल. |
(Special
Disability leave for Accidental Injury) |
¨विशेष विकलांगता रजा १२०
दिवसांपेक्षा अधिक नाही, इतकी रजा मिळण्याचा
हक्क असेल. |
|
(नियम ७५ व ७६ अन्वये) |
|
|
रुग्णालयीन रजा |
पदाची कर्तव्ये पार पाडतांना अनुज्ञेय |
२८ महिन्यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्याचा हक्क असेल. |
(Hospital
Leave) |
||
(नियम ७७ अन्वये) |
||
क्षय रोग/कर्क रोग/कुष्ठ रोग/ पक्षघात रजा(T.B./Cancer/Leprosy/ Paralysis Leave)(नियम ७९ अन्वये) |
रोजंदारी व अंशकालीय कर्मचारी वगळून |
तीन वर्ष सेवेनंतर सवलती अनुज्ञेय |
१२ ते २४ महिन्यांपेक्षा अधिक नाही |
||
अध्ययन रजा (Study Leave) |
लोकसेवेची निकड, कर्तव्य क्षेत्राशी संबंधीत उच्च-शिक्षणासाठी,
पाच वर्ष सेवेनंतर अनुज्ञेय |
संपूर्ण सेवा कालात १२ ते २४ महिने. |
(नियम ८० अन्वये) |
नंतर किमान तीन वर्षे सेवा बंधनकारक. |
|
विशेष नैमित्तिक रजा |
पिसाळलेला कुत्रा अथवा तत्सम जनावराने चावा घेतल्यास. |
२१ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक) |
(Special Casual
Leave) |
||
|
||
विशेष नैमित्तिक रजा |
स्वत: नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास |
६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक) |
(Special Casual
Leave) |
||
विशेष नैमित्तिक रजा |
एकदा केलेली नसबंदी शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे दुसर्यांदा नसबंदी
शस्त्रक्रिया केल्यास |
६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक) |
(Special Casual
Leave) |
||
विशेष नैमित्तिक रजा |
कर्मचार्याच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्त्रक्रिया
केल्यास |
कर्मचार्यास ४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक) |
(Special Casual
Leave) |
||
विशेष नैमित्तिक रजा |
कर्मचार्याच्या पत्नीच्या बाळंतपणाव्यतिरिक्त अन्य वेळी संतती
नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास |
कर्मचार्यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक) |
(Special Casual
Leave) |
||
विशेष नैमित्तिक रजा |
स्त्री कर्मचार्याने बाळंतपणाव्यतिरिक्त अन्य वेळी संतती नियमनाची शस्त्रक्रिया
केल्यास |
स्त्री कर्मचार्यास १४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. |
(Special Casual
Leave) |
(वैद्यकीय दाखला आवश्यक) |
|
विशेष नैमित्तिक रजा |
कर्मचार्याने स्वेच्छेने विनामूल्य रक्तदान केल्यास |
कर्मचार्यास १ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. |
(Special Casual
Leave) |
(वैद्यकीय दाखला आवश्यक) |
|
विशेष नैमित्तिक रजा |
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी |
कॅलेंडर वर्षात ३० दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (क्रिडा अधिकार्याचा
दाखला आवश्यक) |
(Special Casual
Leave) |
||
विशेष नैमित्तिक रजा |
कर्मचार्याच्या पत्नीने बाळंतपणानंतर किंवा अन्य वेळी केलेली नसबंदी शस्त्रक्रिया
अयशस्वी झाल्यामुळे दुसर्यांदा नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास |
कर्मचार्यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक) |
(Special Casual
Leave) |
||
नैमित्तिक/किरकोळ रजा |
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कॅलेंडर वर्षात ८ दिवस साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त नाही. अपवादात्मक परिस्थितीतच
दहा दिवसा वाढविता येते. |
किरकोळ रजा ही रजा समजली जात नाही. अर्जित वा अन्य प्रकारांच्या रजेला
जोडून किरकोळ रजा घेता येत नाही. अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित वा अन्य
प्रकारांच्या रजा घेता येत नाहीत. |
(Casual Leave) |
(किरकोळ रजा शक्यतोवर
बिनपगारी करू नये. किरकोळ रजा नामंजूर करणे,नाकारणे अथवा रद्द करणे अशी
तरतुद कायद्यात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये. |
सार्वजनिक सुट्टी जोडून घेता येते. |
(अचानक, आपत्कालीन खाजगी कामासाठी रजा) किरकोळ
रजा. |
|
सेवापुस्तकात नोंद घेता येत नाही. स्वतंत्र नोंदवही ठेवावी. |
अत्यंत निकड असतांना काढली जाते. |
|
|
मोबदला सुट्टी |
निम्नश्रेणी कर्मचार्यांना अनुज्ञेय. जादा कामाचा आर्थिक मोबदला दिल्यास
अनुज्ञेय नाही. |
सुट्टीत केलेल्या कामाचा मोबदला म्हणून देतात. |
एक कॅलेंडर वर्षात एकावेळी तीन पेक्षा जास्त साठवता येत नाही. पुढीलवर्षी
उपयोगात आणता येत नाही. |
||
विपश्यनेसाठी रजा |
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना एकावेळी १४ दिवस परिवर्तित रजा घेता येते. |
तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा का |
आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
मंगळवार, १४ जानेवारी, २०२५
रजा नियम व तरतुदी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा