Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

गणित अध्यापनासाठी प्रशिक्षण संदर्भात भरावयाची लिंक

राज्यातील १ ली ते ५ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय    ( जि.प./स्थानिक स्वराज्य संस्था) व खाजगी अनुदानित शाळामधील २५ % शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करणेबाबत प्रशिक्षणासाठीची गुगल फॉर्म लिंक https://www.research.net/r/mathstraining ही आहे . या लिंकच्या मदतीने आपल्या जिल्ह्यातील  जास्तीत जास्त संबंधित शिक्षकांकडून मागणी पत्र भरून द्यावे. ही लिंक विदया प्राधिकरणाच्या वेबसाईटवर दि. १९/१०/२०१६पासून उपलब्ध आहे. या लिंकचे नाव गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण मागणी प्रपत्र असून विदया प्राधिकरणच्या वेबसाईटवर यापूर्वी गणित व भाषा प्रशिक्षणापेक्षाही लिंक भिन्न असून  https://www.research.net/r/mathstraining या लिंकवरील मागणी पत्रात माहीती भरलेल्या शिक्षकांनाच २५ % प्रशिक्षणासाठी गृहीत धरण्यात येईल. ही बाब संबंधित शिक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावी. गुगल फॉर्मवर माहिती भरण्याची अंतिम मुदत 14/११/२०१६ ही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत या लिंकचा प्रसारमाध्यमांद्वारे प्रसार करावा.
-  गणित विभाग विद्याप्राधिकरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips