Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६

एखादी फाईल PDF format मध्ये कशी बनवाल?

सर्वप्रथम आपण PDF म्हणजे काय ते समजून घेऊ. PDF हा असा format आहे ज्यामध्ये आपण एखादी फाईल font मध्ये जर बनवली असेल आणि आपणास ती दुसऱ्या संगणकाला जर पहावयाची असेल तर त्या संगणकावर तुम्ही ज्या font मध्ये फाईल बनवली तो font असल्याशिवाय तुम्हला काहीच पाहता येणार नाही. त्यासाठी आपणास ती फाईल PDF मध्ये convert करून घ्यावी लागते.

याचा वापर कोठे होतो? 

  • ज्या ठिकाणी font चा पर्याय उपलब्ध होत नाही.
  • पेज सेट अप करून त्याची PDF बनवल्यास जेथे प्रिंट करणार त्या ठिकाणी पेज सेट अप करण्यास वेळ वाया जात नाही.
  • आपणास एखादी फाईल बनवल्यानंतर त्यात त्रयस्त व्यक्तीस जर बदल करून द्यायचा नसेल तर PDF चा वापर होतो.


PDF मध्ये एखादी file कशी रुपांतरीत करावी? 


  • MS office 2010 या वर्जन मध्ये word/excel/powerpoint ची फाईल PDF मध्ये सेव्ह करायची असेल तर खालील स्टेप्स अवलंबावा.
  • File  >  Save As  > Give file name > Select file Type as : PDF
  • याद्वारे तुमची फाईल PDF मध्ये convert होईल.


जर एखाद्या वेब पेज चे किंवा जेथे save as type PDF उपलब्ध नसेल तेथे आपणास softwear वापरावे लागते.

softwear च्या साह्याने कशी PDF बनवावी? 

  • प्रथम तुमच्या device वर खालील लिंक वरून softwear डाऊनलोड करावे. 
  • http://foxtab-pdf-creator.en.lo4d.com/
  • सर्व प्रथम हे softwear install करून घ्यावे.
  • हे softwear install झाल्यावर त्याचे अस्तित्व प्रिंटर या option मध्ये दिसून येईल.
  • ज्याचे PDF मध्ये conversion करायचे आहे त्या फाईल ला प्रिंट पर्याय दाबा.
  • तुम्हाला प्रिंटर निवडण्यास संधी दिली जाईल. 
  • त्यामध्ये प्रिंटर टाईप "PDF creator" हा पर्याय निवडावा.
  • फाईल ला नाव द्या आणि प्रिंट पर्याय वर क्लिक करा.
  • तुमची फाईल PDF मध्ये रुपांतरीत होईल. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips