Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

सिनेमा पाहणार आहात तर नाना पाटेकरच्या अभिनयाचा "नटसम्राट" पहा नजीकच्या सिनेमागृहात , कमीत कमी किमतीच्या तिकिटामध्ये.....



नाना पाटेकरचा "नट सम्राट " कमीत कमी किमतीच्या तिकिटामध्ये पाहण्यासाठी खालील ऑफर चा लाभ घ्या.

Book My Show : या वेबसाईट वरून या सिनेमाचे तिकीट खालील लाभ सहित खरेदी करा
BookMyShow Wallet :
                        या मध्ये वापरकर्त्याला त्याच्या wallet मध्ये पैसे भरावे लागतात.त्याच्या साह्याने जर सोमवार ते गुरुवार या कालावधीमध्ये जर या wallet च्या साह्याने सिनेमा तिकीट बुकिंग केले तर त्याच्या २५% रक्कम wallet मध्ये परताव्या च्या रुपात मिळते.

बँकेच्या कार्ड वापरावर बुकिंग सवलत :
  ICICI bank Debit card: ICICI बँकेच्या एका तिकीट खरेदीवर दुसरे तिकीट मोफत मिळते. फक्त काही कार्डवर उपलब्ध...

 ICICI bank Credit  card: ICICI बँकेच्या तिकीट खारेदिवार रु.१०० ची सूट.

HDFC बँक कार्डवर सुट : या बँकेच्या कार्डवर ५% सूट मिळते..

Federal बँकेच्या डेबिट कार्डवर रु.१०० चा परतावा मिळतो.

Master Card च्या डेबिट कार्डवर रु.१०० ची सूट मिळते. ऑफर फक्त २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत.

Wallet ऑफर :

१) MobiKWIK wallet : या Wallet मधून दिलेल्या पेमेंट साठी १०% परतावा मिळतो.
२) PayUmoney Wallet : यामधून बुकिंग केलेल्या तिकीट बुकिंग साठी ५% परतावा मिळतो.

WIN-PIN ऑफर :
    BookMyShow या वेबसाईट वर खाते उघडल्यानंतर तुमच्या Register केलेल्या e-mail वर तुम्हाला WIN-PIN code मिळतो. हा कोड वापरल्यानंतर तुमच्या तिकीटाची रक्कम कमीत कमी होते.




1 टिप्पणी:

  1. नटसम्राट.... निःशब्द अनुभव!

    सगळ्यात आधी साष्टांग दंडवत, नटसम्राट टीमला!
    कौतुक कुठून सुरु करावं that is the question.ण .

    अगदी नानाच्या सर्वश्रेष्ठ संवादफेकीपासुन ते विक्रम गोखले सोबतच्या अभिनयाच्या लाजवाब जुगलबंदीपर्यंत सगळचं कसं काळजात खोलवर रुतणारं...

    वैभवकाळ पुरेपुर भोगुन समाधानानं रंगमंचावरुन निवृत्त झालेला नटसम्राट खर्‍या आयुष्यात मात्र नशीबाच्या पायाखाली तुडवल्या जाताना बघवतं नाही... अन जे दिसतं ते अश्रु भरल्या डोळ्यांनी!

    होय, विक्रमजी आणि नाना कित्येक फ्रेम मधे अक्षरशः रडवतात.. त्यांचं दुःख काळजाला भिडतं. विक्रमजींच्या घरातला आणि नंतर हाॅस्पिटलमधला प्रसंग केवळ अभिनयाची शाळाच म्हणुन पहावा.. जीव ओतलायं त्या दोघांनी तिथे!

    दिग्गज कलाकारांनी पूर्वी सजवलेला नटसम्राट नाना वेगळ्याच उंचीवर नेतो. नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि शेवटी बेघर वृद्ध सगळी रुपं नाना लीलया रंगवतो.

    सहज सुंदर अभिनय, अपमान पचवत, माफी मागतानाचा नाना पाहून जीव कालवतो. पत्नीच्या त्यागाची पुरेपूर जाणिव असलेला नाना तिला बंदराची (किनार्‍याची) उपमा देतो तो प्रसंग त्यांच्या नात्याचं खरं रुप दाखवतो. नानाचा अभिनय कोहीनुर असेल तर मेधाजींचा (पत्नीचा) अभिनय म्हणजे सोन्याचा मुकुटचं! त्या हिर्‍याला हे कोंदण नसतं तर ही झळाळी नसती.

    मृण्मयी, सुनिल, नेहा एकदम झक्कास! त्यांनी कुठेही चित्रपटाची उंची खाली येऊ दिली नाही. २ कृष्णांनी करंगळीवर पेललेला पर्वत त्यांनी आपल्याही काठ्या लाऊन साधार केला.

    "कट्यार" मधे एक पुढील आशयाचं वाक्य आहे "कलाकाराला दाद केवळ टाळ्यांनीच मिळते असं नव्हे तर निःशब्द शांतता अन पाणावलेले डोळे ही त्याहून उच्च दाद होय"

    नाना- विक्रमजींचा नटसम्राट हे त्याचं खणखणीत उदाहरण!

    Exit च्या दरवाज्यातुन निघतात ते पाणावलेले डोळे अन अभिनयाचा उत्तुंग ऐव्हरेस्ट पाहिलेले तृप्त रसिक..! अगदी निःशब्द...!!
    (कृपया नटसम्राट चित्रपटाची कोणीही मोबाइलवर VDO रिकॉर्डिंग करू नये, तो मराठी कलाकारांच्या अभिनयाचा अपमान असेल, शक्यतो चित्रपट सिनेमा गृहात जाऊनच पहावा, शेतकऱ्यासाठी झटनारया नानांसाठी आपण एवढे तरी नक्की करु शकतो)

    उत्तर द्याहटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips