Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

E-School चा एक दिवस Google सोबत.


बंगळूरू : दि.२१ सप्टेंबर २०१५

हा दिवस E-School साठी एक आगळावेगळा क्षण होता.ज्यावेळी गुगल चे invitation चा इ मेल मिळाला तेंव्हा त्याचे काहीच महत्व वाटले नाही. एक ए मेल मिळाला त्यामध्ये फक्त फॉर्म भरावयाचा होता.मी हा इ मेल सहजच घेतला.त्यावरती काहीच उत्तर दिले नाही नंतर IT मधील एका मित्राने याचे व्यापक स्वरूप सांगितले. कारण त्याच्या कंपनीमधील काही कर्मचार्यांना यासाठी कंपनीने पाठवले होते.नंतर याचा फोर्म भरल्यानंतर त्यांचे confirmation आले आणि त्यांनी मला माझे एन्ट्री चे सर्व details पाठवले.
               सकाळी ७ वाजता बेंगलोर मध्ये पोहोचलो.कार्यक्रम Bangalore International Exibition hall ला होता.ज्यावेळी reception ला पोहोचलो त्यावेळी त्यांनी मला बोर्डिंग पास मागितला आणि तुमचे application  कोणते असे विचारले. त्यावेळी आनंदाने eschool4u हा  असल्याचे सांगितले.आत गेल्यानंतर आतील भव्य दिव्यता पाहून स्वत:वरच हसलो. कारण अशी संधी कधीच नव्हती.गेल्यानंतर आतील स्क्रीनवर टेस्ट सुरु होत्या. टेस्ट पूर्ण झाल्यावर त्यांचा स्कोर स्क्रीन वर दिसत होता.आपण या सर्वामध्ये कोठे आहोत याची झलक पहावी म्हणून मीही टेस्ट देण्यासाठी सरसावलो.
त्यामध्ये गुगल चे सर्व products व त्यांची माहिती याबद्दलच विचारले होते.आतापर्यंत ३५० हून अधिक जणांनी भाग घेतला होता.जितके गुण पडतील तितकी rank  मिळत होती.सर्व टेस्ट पूर्ण झाल्यावर निकाल पहिला तर विश्वासच बसला नाही.माझी rank तिसरी होती. Suraj 50/100. समाधान वाटले कि आपणास कमीत कमी ५०% तरी माहिती मिळाली.


दुसऱ्या ठिकाणी Google Map ने नवीन GPS लोकेशन Based system launch केली होती.ती एक गेम होती पण त्यासाठी वापरलेली Technology अप्रतिम होती. आपण सर्कल मध्ये उभे राहण्याआगोदर आपणास कोणत्या लोकेशन वर पोहोचवायचे आहे ते ठिकाण निवडावे व त्यानंतर space मधून आलेली आकृती आपले स्थान घेवून आपल्या हलाचालीनुसार कृती करते.यामध्ये समोरील सर्कल मधून जाणे हि एकच अट होती. हा गेम खेळताना मज्जा आली.पण यामध्ये पूर्ण गुण नाही मिळवू शकलो.पण एक चांगला अनुभव आला.




हे सर्व झाल्यानतर गुगल चे नवीन "गुगल नून" नावाचा जो प्रकल्प सुरु होणार होता त्याची making व त्याचे actual Working याबद्दल स्क्रीन वर एक लघुपट दाखवला गेला.
Mobile Android APP मध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली व जे या ठिकाणी हजर राहू शकत नव्हते त्यांची  मुलाखत स्क्रीन वर सुरूच होती. त्यामध्ये बरीचशी माहिती मिळाली.
यानंतर गुगल चे सर्व मान्यवर यांनी गुगल बद्दल बरीचशी माहिती दिली. पण सकाळच्या सत्रानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी सत्रे असल्याने कोणा एका ठिकाणीच उपलब्ध राहता येत होते.

खरा फायदा Lunch Break मध्ये झाला.काही मित्रांचे मित्र उपलब्ध होते , मित्रांना संपर्क क्रमांक विचारून त्यांना भेटलो.या व्यक्तींना आपण इतर वेळी भेटणे व अशा ठिकाणी भेटणे हा एक वेगळाच अनुभव असतो. कारण मला येथे जाणवले कि येथे प्रत्येकजण स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आला आहे. या ब्रेक मध्ये सार्वजन एकमेकांची ओळख करून घेत होता.संपर्क क्रमांक वाढवीत होता.मला विचारले कि तुम्ही काय करता? मी सांगितले कि मी शिक्षक आहे. ते हि प्राथमिक. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव वेगळाच होता.
तुम्ही येथे कसे? आणि तुम्हाला हे Invitation कसे मिळाले? कारण मला हे e mail वरून मिळाले होते , पण त्या ग्रुपमधील विचारणारा प्रत्येकजण नामांकित कंपनीमधून आला होता.आणि त्यांच्या कंपन्यांनी जे बेस्ट आहेत त्यांना स्वखर्चाने पाठवले होते.
Myntra , Jabong, School Mania यासारख्या कंपनीतील Developers ची चांगली ओळख झाली होती. मी जे बनवले होते ते शिक्षण क्षेत्रातील फक्त होते.त्यावेळी त्यांना हेही समजले कि माझ्यासारखी महाराष्ट्रातील कितीतरी शिक्षक छंद व आवड म्हणून यामध्ये काम करतात. त्यावेळी मला काही जणांनी संदीप गुंड व बालाजी जाधव या नावाबद्दल विचारले तर मला आणखी आनंद झाला.कारण आता हि मंडळी देश पातळीवर पोहोचली होती व आता जगातील शिखरे सर करतील हि अपेक्षा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips