छत्रपती शिवाजी :
नुसते नाव घेतले तरी अंग सळसळून निघते, इतिहासाच्या पुस्तकात नुसते शिकण्यासाठी छत्रपती नाहीत हं . तर प्रत्येक क्षेत्रात या दैवताचे नाव घेतले जाते. आजही शिवरायांच्या साहसी कथा आजच्या जिजाऊ आपल्या मुलाला शिवाजी बनविण्यास सांगत असतील हि पण या दैवताच्या माहितीचा खजिना जर जवळ नसेल तर.. आपण आजही ऐकीव किंवा वाचलेल्या कथाच फक्त सांगतोय पण या दैवताला समजून घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे.
आजच्या जीवनात या विचारांचे रोप रुजवणे खरच गरजेचे आहे. शिवराय व त्यांचे विचार एका योग्य पंक्तीत ठेवण्याचे व त्याला आधुनिक जीवनाशी जोडण्याचे कार्य अनेकांनी केले आहे. मग त्यामध्ये अलीकडेच आलेला " मी शिवाजीराजे भोसले बोलतोय |" हा चित्रपट खूपच काही शिकवून गेला. आजच्या आधुनिक युगात महाराजांचे विचार याही युगाच्या पुढील असलेले दिसतात.
नुकताच रिलीज झालेला "बघतोस काय मुजरा कर " हा चित्रपट तर शिवरायांच्या किल्ल्यांची होणारी हेळसांड तसेच शिवरायांच्या नावाचा होणारा गैरवापर यावर खरेच हा धाडसी चित्रपट तयार केला आहे असे म्हणावयास हरकत नाही. हे चित्रपट पाहिल्यास खरेच आपणास स्वराज्य मिळाले पण या गडकिल्ले आणि शिवरायांच्या विचारांना नाही असेच वाटेल. असेच गोविंद पानसरे यांनी लिहिलेले पुस्तक "शिवाजी कोण होता" हे पुस्तक तर तुफान गाजले.या पुस्तकाने तीन आवृत्ती प्रसिद्ध केल्या आणि अत्यल्प किमतीत त्या उपलब्ध होत्या. या पुस्तकाला न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी खूपच चांगला रिमार्क दिला आहे. हा डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा